Download App

सलमानच्या हत्येचा कट रचणाऱ्या दोघांना जामीन मंजूर, हायकोर्टाचा मोठा निर्णय

सलमान खान (Salman Khan) हत्येच्या कथित प्रकरणात वास्पी मेहमूद खान आणि गौरव विनोद भाटिया उर्फ संदीप बिश्नोई यांना जामीन मंजूर झाला.

  • Written By: Last Updated:

Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) हत्येच्या कथित प्रकरणात वास्पी मेहमूद खान (Waspi Mehmood Khan) उर्फ वसीम चिकना आणि गौरव विनोद भाटिया उर्फ संदीप बिश्नोई (Sandeep Bishnoi) यांना जामीन मंजूर झाला. मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court हा जामीन मंजूर केलाय. वास्पी खान आणि ​​संदीप बिश्नोई यांच्याविरुद्ध कोणतेही ठोस पुरावे न मिळाल्याने त्यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.

पुढील आठवड्यात PM मोदी अमेरिका दौऱ्यावर, डोनाल्ड ट्रम्प यांना कधी भेटणार? 

न्यायालयाने म्हटलं की, वसीम चिकना आणि संदीप बिश्नोई हे सलमानच्या हत्येच्या कटाची चर्चा करणाऱ्या व्हॉट्सअॅप ग्रुपचा भाग होते. परंतु, त्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये कोणतेही ठोस पुरावे नाहीत. ते दोघेही अभिनेत्यावरील हल्ल्यात थेट सहभागी असल्याचं दिसत नाही, असं सांगत कोर्टाने पुराव्यांच्या अभावामुळे हा जामीन जामीन दिलाय.

सुनावणी दरम्यान आरोपीच्या वकिलांनी सांगितले की, वास्पी आणि संदीप हे बिश्नोई टोळीचा भाग नाहीत. तसेच ते कथिट कटात सहभागी नसल्याने त्यांना जामीन मिळावा, अशी मागणी केली होती. तर या मागणीला अतिरिक्त सरकारी वकील गीता मुळेकर यांनी विरोध केला. मुळेकर म्हणाल्या की, आरोपींवरील आरोप गंभीर आहेत. त्यांनी जामीन मिळू नये.

‘हिंदू गर्जना चषक’ राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेस शानदार प्रारंभ! . 7 ते 9 फेब्रुवारी रंगणार जंगी आखाडा 

संपूर्ण प्रकरण काय आहे?
१४ एप्रिल २०२४ रोजी सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गोळीबार झाला होता. २४ एप्रिल रोजी नवी मुंबई पोलिसांनी पनवेलमध्ये सलमानच्या कारवर हल्ला करण्याचा कट रचणाऱ्या लॉरेन्स टोळीतील चार जणांना अटक केली. गौरव भाटिया उर्फ ​​न्हाई, वास्पी खान उर्फ ​​वसीम चिकना, धनंजय उर्फ ​​अजय कश्यप आणि झीशान खान उर्फ ​​जावेद खान अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील पाचव्या आरोपीला पोलिसांनी ३ जून रोजी हरियाणा येथून अटक केली. या प्रकरणात एकूण ७ जणांना अटक करण्यात आली.

मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सर्व आरोपी सुमारे दीड महिन्यापासून सलमान खानच्या पनवेल येथील फार्महाऊसवर लक्ष ठेवून होते. यासाठी त्याने पनवेलमध्येच एक खोली भाड्याने घेतली होती.

दरम्यान, सलमानच्या कथित हत्येचा कट ज्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर कट रचण्यात आला होता आणि ज्या ग्रुपवर चर्चा करण्यात आली होती. त्या ग्रुपमध्ये वास्पी आणि संदीप यांची उपस्थिती वगळता त्यांच्याविरुद्ध कोणताही ठोस पुरावा नसल्याचे आढळून आल्यानंतर न्यायमूर्ती एन.आर. बोरकर यांच्या खंडपीठाने वास्पी आणि ​​संदीप बिश्नोई यांना जामीन मंजूर केला.

 

follow us