‘हिंदू गर्जना चषक’ राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेस शानदार प्रारंभ! . 7 ते 9 फेब्रुवारी रंगणार जंगी आखाडा

‘हिंदू गर्जना चषक’ राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेस शानदार प्रारंभ! . 7 ते 9 फेब्रुवारी रंगणार जंगी आखाडा

Hindu Garjana Chashak state wrestling match Pune : हिंदू गर्जना प्रतिष्ठान व पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने ‘हिंदू गर्जना चषक महिला व पुरुष राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेस आज प्रारंभ झाला. स्पर्धेत पुण्यासह पिंपरी, चिंचवड, बारामती, मावळ, हवेली, शिरूर, मुळशी, इंदापुर, दौंड, पुरंदर, भोर, वेल्हे या वेगवेगळ्या तालूक्यातून कुस्तीपटू सहभागी झाले आहे.

निकालाच्या आधीच दिल्लीत घडामोडींना वेग! आपच्या दाव्यानंतर केजरीवालांच्या घरी एसीबी दाखल

शिक्षण प्रसारक मंडळी यांच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आणि पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या या मान्यतेने घेण्यात आलेल्या या स्पर्धेत स्पर्धेत १४ वर्षाखालील कुमार गटामध्ये २७४ खेळाडू, १७ वर्षाखालील गटामध्ये १९९, वरिष्ठ गटामध्ये १९८, महिला गटात ६०, कुमार खुला गटामध्ये ३५, वरिष्ठ खुल्या गटामध्ये ७६ आणि महिला खुल्या गटामध्ये २७ खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे.

मोठी बातमी! ५ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळले, वाचा नेमकी कारणे काय?

टिळक रोड येथील स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर आज सकाळच्या सत्रामध्ये स्पर्धेत १४ वर्षाखालील कुमार गटाच्या लढती घेण्यात आल्या. मध्यभागी कुस्तीचे आखाडे आणि प्रेक्षक गॅलरी असे भव्य कुस्ती स्टेडियमची निमिर्ती या स्पर्धेसाठी केली गेली आहे. मैदानावर मातीचे दोन स्वतंत्र आखाडे तयार करण्यात आले असून आखाड्यांच्या बाजुने क्रीडारसिकांची १० हजार प्रेक्षकांची बसण्याची सोय केली आहे.

तसेच वाहनांच्या पार्किंगसाठी व्यवस्थाही करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी येणार्‍या पुरूष आणि महिला पैलवानांसाठी राहण्याची आणि भोजनाची सोय करण्यात आल्याचे पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन आणि हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष धीरज रामचंद्र घाटे यांनी सांगितले. संध्याकाळच्या सत्रामध्ये (संध्याकाळी ६ वाजता) स्पर्धेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्ता मामा भरणे हे उपस्थित होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube