ओटीटीवर प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट, (Film) रिअॅलिटी शो आणि वेब सीरिज पाहता येतात. तसंच, अनेक खेळांचे सामनेदेखील पाहता येतात. अनेक कलाकारांना वेब सीरिजमधून मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली आहे. मराठीमध्येदेखील आता उत्तम वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. आता लोकप्रिय अभिनेता आणि अंकुश चौधरी आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी लवकरच देवखेळ या मराठी वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या निमित्ताने अंकुश आणि प्राजक्ताने लेट्सअप मराठीवर गप्पा मारल्या आहेत.
काय आहे देवखेळ याबाबत विचारलं असताना अभिनेता अंकुश चौधरी म्हणाला, देवखेळ हा शिमग्याच्या निमित्ताने हा खूप्र प्रसिद्ध खेळ आहे. या दिवसांत सहा सहा महिने अगोदर चाकरमान्यांनी आपल्या गावी जाण्याचा प्लॅन केलेला असतो. यासाठी काही चाकरमाण्यांनी तर नौकऱ्या सोडल्या आहेत इतका हा जिव्हाळ्याचा आणि आत्मियतेने साजरा केलेला खेळ म्हणजे सण आहे असं अंकुशने यावेळी सांगितलं. यामध्ये एक पालखी फिरवली जाते. त्यामध्ये सगळे आपल्या खांद्यावर घेऊन नाचत असतात, सगळ्यांच्या घरी ती फेरी जाते असंही तो यावेळी म्हणाला आहे.
यामध्ये अभिनेत्री प्राजक्ता म्हणाली ही पद्धत कोकणी माणसाला माहिती आहेच. परंतु, कोकणाबाहेरच्या माणसांना अधिक पोहचणारी आणि त्याबद्दल कुतुहल वाटणारी ती आहे असं ती म्हणाले. तसंच, या गोष्टी माझ्या मनाला आवडणाऱ्या गोष्टी आहेत. मला हा सण पाहिल्यावर ते आवडंल असंही ती म्हणाली. देवखेळमधील अनेक असे पात्र आहेत की ते सर्व यातील गोष्टी मानणारे आहेत. काही लोक आहेत जे मानत नाहीत. परंतु, सण, देव, धर्म उत्सवर हे मानणारे आहेत असंही प्राजक्ताने सांगितलं आहे.
एक पोलीस अधिकारी बदली होऊन त्या ठिकाणी येतो आणि त्याचवेळी शिमग्याचा सण असतो. त्याच काळात ही मर्डर हिस्ट्री उलगडते असंही अंकुश चौधरी यावेळी म्हणाले. यामध्ये प्रश्न विचारणं हा गुन्हा मानला जातो तेव्हा प्राजक्ता कशी पाहते असं म्हटलं तर ती म्हणाली कोकणातील अनेक परंपरा आहेत. तेथील माणूक कसा जगतो हे पाहण महत्वाचं आहे, असंही प्राजक्ता म्हणाली. अनेक वादळांना तोंड देणारी स्त्री यामध्ये पाहयाला मिळते असंही ती म्हणाली.
