अनेक अफेअर अन् डेंजर डेंजर ब्रेकअप्स…, अभिनेत्री प्राजक्ता माळीने सांगितले अनेक किस्से

अनेक अफेअर अन् डेंजर डेंजर ब्रेकअप्स…, अभिनेत्री प्राजक्ता माळीने सांगितले अनेक किस्से

Actress Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आहे. (Prajakta) तिच्या फुलवंती या चित्रपटामुळे तर तिला खास ओळख मिळाली. तिची फॅनफॉलोईंग देखील बरीच वाढली. तसंच, तिच्यातील अभिनयाचा एक वेगळाच पैलू प्रेक्षकांना पाहायला मिळाला. तिने अनेक मुलाखतींमध्ये तिच्या स्ट्रगलबद्दल सांगितलं आहे. तिच्या लव्ह लाईफबद्दल सांगितलं आहे. तिने एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी सांगितल्या.

मी आयुष्यात विशेषत: टीएनएजनंतर खूप काही पाहिलं आहे. वयाच्या 17 व्या वर्षांनंतर मी पुढे आयुष्यात एकदम डेंजरस काळ पाहिला. त्यातूनच मी स्ट्राँग मुलगी म्हणून बाहेर पडले. मला जाणवलं की इतकं शांत राहिलात तर तुम्ही कुठंच पोहोचू शकणार नाही. छोटंच जग बनून राहील आणि एवढं तर मी राहू शकत नाही. मी इथे आयुष्य जगायला आलीये तर काहीतरी बँग ऑन करुनच जाणार. असं मी मरु शकत नाही. असं म्हणतं तिने तिच्या कठीण काळाबद्दल बरंच काही सांगितंल आहे.

लालछडी..! प्राजक्ताचा लाल शरारा ड्रेसमध्ये ग्लॅमरस लूक

डेंजर डेंजर ब्रेकअप्स झालेत. तसंच, मी बरेच संघर्ष स्वत:च ओढवून घेतले. माझा पुणे-मुंबई स्ट्रगल खूप मोठा होता. कुटुंबाचा मानसिकरित्या पाठिंबा होता. पण प्रत्यक्षात आजूबाजूला मनुष्यबळ नाही. आजही माझं मुंबईत कोणीही नातेवाईक राहत नाहीत. मी खूप मानसिक, भावनिक संघर्ष पाहिला. त्या जोडीला आर्थिक संघर्ष होता. खूप टप्पे टोमणे, धक्के, पाणउतारा, अपमान, ग्रुपिजम, जातीवाद सगळंच पाहिलं. त्यातून मी घडत गेले असंही ती म्हणाली.

प्राजक्ताने मुलाखीतत बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला. अगदी अभिनयातील तिचे सुरुवातीचे दिवस ते मालिका मिळाल्यानंतरचे तिचे दिवस सगळंच तिने सांगितलं. दरम्यान, प्राजक्ता अध्यात्माकडे कशी वळाली याबद्दल देखील तिने भावना व्यक्त केल्या. प्राजक्ता माळीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, फुलवंतीनंतर चिकी चिकी बूबूम बूम या चित्रपटात ती दिसली होती. प्राजक्तासोबतच या सिनेमात स्वप्निल जोशी, प्रार्थना बेहेरे, प्रसाद खांडेकर, रोहित माने आणि प्रथमेश शिवलकर हेसुद्धा दिसून आले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube