Download App

Sydney Opera House : काय आहे सिडनी ॲापेरा ? प्रविण तरडेंनी थेट ॲास्ट्रेलियातून सांगितले…

सिडनी : दिग्दर्शक प्रविण तरडे सध्या त्यांच्या पत्नी स्नेहल तरडे यांच्यासह ॲास्ट्रेलियाला गेले आहेत. यावेळी त्यांनी ॲास्ट्रेलियाच्या सिडनी शहरातील जगविख्यात सिडनी ॲापेरा हाऊस येथून आपला एक अनुभव शेअर केला आहे. सिडनीतील ॲापेरा हाऊसमध्ये त्यांनी ईटालियन ॲापेरा पाहिला. त्याचा अनुभव आणि ॲापेरा म्हणजे काय ? हे सांगितले.

https://fb.watch/j1uLUzcp5d/

यावेळी प्रविण तरडे म्हणाले की, ‘नाटक करणाऱ्या, लिहीणाऱ्या, दिग्दर्शित करणाऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची जागा आहे. जगभरातील अनेक कलाकार येथे येतात. आपल्या संगीत नाटकाप्रमाणे येथे ॲापेरा सादर होतात. म्हणजेच नाटकं सादर होतात. जगभारातील विविध भाषांमधील ही नाटकं असतात. पण याला चित्रपटाप्रमाणे सबटायटल्स असतात. त्यामुळे ते आपल्याला समजने सोपे आहे. त्यामुळे त्यांनी लोकांनी आणि विशेषतः नाटक करणाऱ्या या ठिकाणाला भेट देऊन नाटकं पाहण्याचं अवाहन केलं आहे.

Marathi Movie : आता थ्रिलकॅाम ‘वाळवी’ पाहा फक्त 99 रूपायात

त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, ते सह्याद्री सिडनी आयोजित भारताबाहेरील सर्वात मोठी शिवजयंती साजरी करायला ते इथे आले आहेत. तसेच आज अचानक हा ईटालियन ॲापेरा पाहण्याचा योग जळून आला. असंही त्यांनी सांगितलं.

Tags

follow us