Marathi Movie : आता थ्रिलकॅाम ‘वाळवी’ पाहा फक्त 99 रूपायात

Marathi Movie : आता थ्रिलकॅाम ‘वाळवी’ पाहा फक्त 99 रूपायात

मुंबई : नेहमी प्रमाणे दिग्दर्शक परेश मोकाशी आणि झी स्टुडिओज हे ‘वाळवी’च्या माध्यमातून ते असाच एक वेगळा विषय घेऊन आले आणि प्रेक्षकांनाही हा थ्रिलकॅाम प्रचंड आवडला. त्यांनी तो अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. आता चित्रपटाला 50 दिवस पुरण झाले आहेत. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना फक्त 99 रूपायात पाहायला मिळणार आहे. ही ऑफर फक्त एका आठवड्यासाठी लागू असणार आहे. निर्मात्यांकडून याबद्दल पोस्टरद्वारे माहिती देण्यात आली आहे.

दिग्दर्शक परेश मोकाशी आणि झी स्टुडिओज यांनी एकत्र येऊन केलेली कलाकृती ही नेहमीच अनोखी असते. परेश मोकाशी यांची खासियत म्हणजे एका सामान्य विषयालाही ते असामान्य स्वरूप देतात. झी स्टुडिओज आणि मधुगंधा कुलकर्णी निर्मित, परेश मोकाशी यांची कथा, पटकथा आणि संवाद लाभलेल्या ‘वाळवी’या चित्रपटाने सिनेमागृहात यशस्वी अर्धशतक साजरे केले आहे. स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे आणि नम्रता संबेराव यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत.

‘आई कुठे काय करते’ मालिकेत पार पडलं अरुंधती आणि आशुतोषचं लग्न…

दिग्दर्शक परेश मोकाशी दिग्दर्शित वाळवी या चित्रपटाने अत्यंत हिट झाला. त्यानंतर आता वाळवीच्या यशानंतर ‘वाळवी 2’ ची घोषणा करण्यात आली. सध्या या चित्रपटाचा चौथा आठवडा सुरू आहे मात्र अजून देखील प्रेक्षकांची गर्दी खेचून आण्यात हा चित्रपट यशस्वी ठरत आहे. हेच यश साजरे करण्यासाठी आणि परेश मोकाशी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी ‘वाळवी 2’ ची घोषणाही करण्यात आली. मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी आणि झी स्टुडिओजचे मंगेश कुलकर्णी यांनी लवकरच ‘वाळवी 2’ घेऊन येत असल्याचे जाहीर केले. दिग्दर्शक परेश मोकाशी आणि लेखक, निर्माती मधुगंधा कुलकर्णी म्हणतात. ‘हा चित्रपट प्रेक्षकांना आवडतोय. त्यांच्याकडून चित्रपटाबद्दल चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळेच आम्हाला ‘वाळवी 2′ ची प्रेरणा मिळाली.’

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube