Download App

Johnny Lever birthday : …म्हणून मुलासाठी चित्रपटांतून संन्यास घेत जॉनी लिव्हर झाले होते धर्मगुरू

Happy birthday Johnny Lever : अनेकदा असं बोललं जात की, गॉडफादर असल्याशिवाय बॉलिवूडमध्ये पाय रोवू शकत नाही. मात्र त्याला अपवाद ठरले ते ‘जॉनी लिव्हर’. आज ते बॉलिवूडचे एक ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध असे विनोदी अभिनेते आहेत. मात्र त्यांचा इथपर्यंत येण्याचा प्रवास सोपा नव्हता. घरच्या परिस्थितीमुळे शिक्षण घेता नाही आलं. त्यामुळे रस्त्यावर पेन विकून, मिमिक्री करून त्यांनी उपजिवीका भागवली. आज 14 ऑगस्ट त्यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचा हा प्रवास कसा आहे? जाणून घेऊ… ( When Johnny Lever make Spiritual Guru To know his Struggle on Johnny Lever birthday )

मोठी कारवाई : पुण्यात कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय ड्रग्स सिंडिकेटचा पर्दाफाश; दोघांना अटक

शिक्षण नव्हतं मात्र आपल्या मिमिक्रिच्या जोरावर जॉनी लिव्हर यांनी बॉलिवूडमध्ये आपली वेगळी जागा निर्माण केली. आज ते बॉलिवूडच्या टॉप कॉमेडियन पैकी एक आहेत. त्यांच्या जीवनात मात्र अनेक चढ उतार आले एक वेळ तर अशी होती की, त्यांच्या बहिणीचा मृत्यू झाला होता. मृतदेह अद्याप घरातच होता. मात्र त्यांना एका शोमध्ये जाऊन कॉमेडी करावी लागली होती. तर एक वेळ अशी होती की, ते चित्रपट सोडून अध्यात्मिक गुरू झाले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती खूप खराब, 15 ऑगस्टनंतर बळजबरीने अॅडमिट करणार; शिरसाटांची माहिती

चित्रपट सोडून झाले अध्यात्मिक गुरू…

मुलाला कॅन्सर म्हणजे गळ्याचा ट्युमर झाल्याचं काळालं. तेव्हा जॉनी लिव्हर यांच्या पाया खालची जमीन सरकली होती. याबद्दल एका मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितल होत की, 2011 ची ही गोष्ट आहे. जेव्हा कॅन्सरच कळालं तेव्हा ते हताश झाले होते. चित्रपटांमध्ये काम करणं सोडलं. देवाच्या प्रार्थना करत ते फिरत होते. ते धर्मगुरू झाले होते. तर परदेशात ते धर्मप्रसाराचं काम करत. ते धार्मिक होते. मात्र या घटनेने त्यांना पूर्ण बदलून टाकल होतं. त्यांचे उपदेश ऐकायला लोक गर्दी करत

डॉक्टरांनी सांगितल होतं की, सर्जरी करताना त्यांच्या मुलाचा मृत्यू होऊ शकतो. मात्र देवाच्या कृपेने जेव्हा त्याच डॉक्टरांकडे ते मुलाला 10 दिवसांनी घेऊन गेले तेव्हा त्याचा कॅन्सर पूर्ण नष्ट झाला होता. त्यांचा मुलगा आता एकदम ठिक आहे. तो सोशल मीडियावर जॉनी लिव्हर यांच्यासोबत व्हिडीओ शेअर करत असतो.

जॉनी लिव्हर यांच्या मुलाने ‘कभी खूशी कभी गम’ मध्ये जॉनी लिव्हर यांच्याच मुलाची बाल कलाकार म्हणून भूमिका केली आहे. त्यानंतर तो ‘वॉर’ आणि ‘ये साली आशिकी’ या चित्रपटामध्ये देखील काम केले आहे.

Tags

follow us