Download App

Sooraj Pancholi: जिया खान प्रकरणी निर्दोष सुटका झालेला सूरज पांचोली आहे कोण ?

Sooraj Pancholi : बॉलिवूड अभिनेत्री जिया खान (Jiah Khan) आत्महत्येप्रकरणी अभिनेता सूरज पांचोलीला (Sooraj Pancholi) दिलासा मिळाला. पुराव्यांअती त्याची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप सूरजवर लावण्यात आला होता. परंतु आता निर्दोष सुटका झाल्यावर सूरज यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे, म्हणाला की,’सत्याचा नेहमी विजय होत असतो’.

कोण आहे सूरज पांचोली?

सूरज पांचोली (Sooraj Pancholi) हा बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता मानला जातो. चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आदित्य पांचोली यांचा हा मुलगा आहे. सूरजने अभिनयासह सहाय्यक दिग्दर्शक म्हणून देखील मोठ्या प्रमाणात काम केले आहे. सूरजने वयाच्या ९व्या वर्षी मार्शल आर्टचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली होती.

सूरजचे संपूर्ण शालेय शिक्षण मुंबईमध्ये झाले आहे. शाळेत असताना तो २ वेळेस नापास झाला होता. शिक्षणामध्ये गोडी न निर्माण झाल्याने सूरजने बारावीत असताना शिक्षण सोडले होते. अभ्यासात गोडी नसल्याने सूरजने २०१० मध्ये संजय लीला भन्साळींच्या ‘गुजारिश’ या चित्रपटाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केला आहे. या चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती.

तब्बल 10 वर्षांनंतर जिया खान मृत्यू प्रकरणी सुरज पंचोलीची निर्दोष मुक्तता

तसेच ‘गुजारिश’ या चित्रपटानंतर सूरज पांचोलीला अभिनयाची गोडी लागली होती. त्याने ३ महिन्यांचे अभिनयाचे प्रशिक्षण घेतले होते. सूरज बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा (Salman Khan) मोठा चाहता आहे. यामुळे भाईजानच्या सांगण्यावरुन त्याने ‘एक था टायगर’ या चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शनाचे काम केले होते.  सूरजने २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हिरो’ या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले होते.


‘टाइम टू डान्स’, ‘हवा सिंह’ या चित्रपटात देखील सूरज झळकला होता. सूरजला फिल्मफेअर, स्टार डस्ट, स्टार गिल्ड सारखे अशा अनेक पुरस्कार मिळाले आहेत. हे सर्व पुरस्कार त्याला त्याच्या पहिल्या ‘हिरो’ या चित्रपटासाठी मिळाले आहेत. सूरज पांचोली चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखले जाते. सूरज एका सिनेमात २ ते ३ कोटी मानधन घेत असतो. मुंबईतील जुहू भागात त्याचे मोठे आलिशान घर देखील आहे. कमी काळात लोकप्रिय झालेला सूरज आज कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे.

Tags

follow us