Download App

सई पुन्हा नेटफ्लिक्ससोबत नवीन प्रोजेक्ट घेऊन येणार? ‘त्या’ एका पोस्टने वेधलं सगळ्यांचं लक्ष

अनेक बड्या कलाकारांची सोबतीने सई यात मुख्य भूमिका साकारणार असल्याचं कळतंय. सईचा बॉलिवुड प्रवास इथेच न संपता आगामी ग्राउंड

  • Written By: Last Updated:

Sai Tamhankar : बॉलिवूड मध्ये स्वतःच्या अभिनयाची छाप पाडणारी पाथब्लेझर सई पुन्हा एकदा बॉलिवूड प्रेक्षकांना तिच्या अभिनयाचा प्रेमात पाडण्यासाठी सज्ज झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. (Sai Tamhankar ) कारण सईने सोशल मीडिया वर एक पोस्ट टाकली असून, आता सगळ्यांना सई पुन्हा नेटफ्लिक्स सोबत काय नवीन प्रोजेक्ट करतेय याची उत्सुकता आहे.

Sai Tamhankar : सई ताम्हणकरचा बॉडीकॉन ड्रेसमधील मादक अंदाज

सई ने सोशल मीडिया वर एक पोस्ट केली असून त्याला कॅपेशन दिलं ” प्रेसिंग प्ले समथिंग सरप्राइज ऑन इज यूर वे ” आता हे नक्की काय आहे हे 3 फेब्रुवारी ला समजणार अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. सईच्या अभिनयाने बॉलिवुड प्रेक्षकांना मोहित तर केलं आहे सोबतीला ती आगामी डब्बा कार्टेल या नेटफ्लिक्स सीरिज मध्ये सुद्धा पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

अनेक बड्या कलाकारांची सोबतीने सई यात मुख्य भूमिका साकारणार असल्याचं कळतंय. सईचा बॉलिवुड प्रवास इथेच न संपता आगामी ग्राउंड झीरो, मटका किंग आणि अनेक बॉलिवूड प्रोजेक्ट्स मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सर्वच चाहत्या वर्गला याची आता मोठी उत्सुकता लागलेली आहे.

follow us