Gulabi Movie: महिला दिनानिमित्त श्रुती मराठेच्या आगामी सिनेमा ‘गुलाबी’ची घोषणा

Gulabi Movie Announcing : जागतिक महिला दिनाच्या (Women Day) निमित्ताने व्हॉयलेट फ्लेम मोशन पिक्चर्स निर्मित ‘गुलाबी’ (Gulabi Movie) या चित्रपटाची नुकतीच सोशल मीडियावर (social media) घोषणा करण्यात आली आहे. (Marathi Movie ) लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.   View this post on Instagram   A post shared by Gulaabi (@violetflamepictures) अभ्यंग कुवळेकर दिग्दर्शित […]

Gulabi Movie: महिला दिनानिमित्त श्रुती मराठेच्या आगामी सिनेमा 'गुलाबी'ची घोषणा

Gulabi Movie: महिला दिनानिमित्त श्रुती मराठेच्या आगामी सिनेमा 'गुलाबी'ची घोषणा

Gulabi Movie Announcing : जागतिक महिला दिनाच्या (Women Day) निमित्ताने व्हॉयलेट फ्लेम मोशन पिक्चर्स निर्मित ‘गुलाबी’ (Gulabi Movie) या चित्रपटाची नुकतीच सोशल मीडियावर (social media) घोषणा करण्यात आली आहे. (Marathi Movie ) लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


अभ्यंग कुवळेकर दिग्दर्शित या चित्रपटाचे स्वप्नील भामरे, अभ्यंग कुवळेकर, शीतल शानभाग आणि सोनाली शिवणीकर निर्माते आहेत. तर या चित्रपटात श्रुती मराठे, मृणाल कुलकर्णी, अश्विनी भावे, सुहास जोशी, शैलेश दातार, अभ्यंग कुवळेकर आणि निखिल आर्या यांच्या मुख्य भूमिका आहेत.

चित्रपटाच्या पोस्टरवरून, नावावरून हा चित्रपट तीन मैत्रिणींची कथा सांगणारा दिसत असला तरी तिघींची पार्श्वभूमी वेगळी आहे. त्यामुळे यात काहीतरी अनोखं आणि वेगळे पाहायला मिळणार हे नक्की, सध्या तरी पोस्टरवरून आपण इतकाच अंदाज बांधण्यात येत आहे.

Tiger Shroff: ‘बागी 3’ सिनेमाला 4 वर्ष पूर्ण होताच अभिनेत्याची खास पोस्ट, म्हणाला…

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अभ्यंग कुवळेकर म्हणतात की, ” आज आमच्या चित्रपटाची घोषणा होतेय. चित्रपट स्त्रीप्रधान असला तरी यात मनोरंजनही आहे. हळूहळू चित्रपटातील अनेक गोष्टी समोर येतीलच. सध्या तरी एकच सांगेन अतिशय प्रतिभाशाली अभिनेत्री यात अभिनय करत आहेत.”

Exit mobile version