Download App

“हरल्यानंतर जिंकतो त्याला बाजीगर…”, भारताच्या पराभवानंतर बॉलिवूड सेलिब्रिटींची पोस्ट चर्चेत

  • Written By: Last Updated:

World Cup 2023 Final: विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने त्यांच्या लौकिकाला (IND vs AUS Final) साजेसा खेळ करत भारतीय संघाचा दारूण पराभव केला. या सामन्यात भारतीय खेळाडू सगळ्याच आघाड्यांवर अपयशी राहिले. 241 धावांचे माफक आव्हान ऑस्ट्रे्लियाने (Australia) सहज पार केले. अंतिम सामन्यात अपयश आल्याने कोट्यावधी देशवासियांचे स्वप्न भंगले. मात्र, यादरम्यान काही सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देताना दिसले. काजोलसह अनेक सेलिब्रिटीनीं भारतीय क्रिकेटपटूंसाठी खास पोस्ट लिहिले आहेत.

काजोलची पोस्ट 

बॉलीवूड अभिनेत्री काजोलने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर टीम इंडियाचा एक फोटो शेअर करून त्यांना प्रोत्साहन केले आहे. त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने लिहिले आहे की,’जो हरल्यानंतर ही जिंकतो, त्याला बाजीगर म्हणतात.. टीम इंडिया खूप चांगली खेळी.. ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन..’

अहान शेट्टीची पोस्ट

त्याचवेळी अथिया शेट्टीचा भाऊ अहान शेट्टीनेही टीम इंडियाच्या अधिकृत पेजची पोस्ट रिपोस्ट केली आहे. यामध्ये असे लिहिले आहे की, या टीमने आम्हाला खूप आनंद दिला आहे.. संपूर्ण स्पर्धेत तू शानदार होतास. अभिनेत्री नुसरत भरुचाने इन्स्टाग्रामवर चेहरा लपवत एक फोटो शेअर केला आणि लिहिले, “आता पाहू शकत नाही..”


मीराने टीम इंडियाला चॅम्पियन ऑफ हार्ट दिले

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतनेही टीम इंडियाचा एक फोटो शेअर केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये मीराने लिहिले, ‘चॅम्पियन्स ऑफ अवर हार्ट..’


बोमन इराणीने टीम इंडियासाठी खास पोस्ट 

अभिनेता बोमन इराणीनेही टीम इंडियाला प्रोत्साहन दिले आणि ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘टीम इंडिया आम्हाला संपूर्ण वेळ चांगला खेळ दाखवला… तो आजही शानदार खेळला..’


अमिताभ बच्चन यांची निळ्या जर्सीवाल्यांसाठी…. 

शतकातील या मेगास्टारने टीम इंडियाच्या पराभवानंतर एक पोस्ट देखील शेअर केली आणि लिहिले, ‘खूप प्रयत्नांनंतर एक कठीण पराभव.. संपूर्ण सामन्यात निळ्या रंगाच्या पुरुषांची उत्तम कामगिरी.. सध्या बिग बींच्या या ट्विटचे चाहतेही कौतुक करत आहेत.

आयुष्मान खुरानाची खास पोस्ट

अभिनेता आयुष्मान खुरानानेही स्टेडियमचे काही फोटो शेअर केले आहेत. सोबतच अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘ऑफिसमध्ये फक्त एक वाईट दिवस @Indiancricketteam… #WorldCup2023 मधील सर्वात कठीण संघ म्हणून तुम्हाला कायम लक्षात ठेवले जाणार आहे…’

Tags

follow us