World Government Summit: 2024 मध्ये दुबई येथे ‘वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट’ (World Government Summit) होणार आहे. या कार्यक्रमात जगातील सर्व दिग्गज व्यक्ती सहभागी होणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) यांच्यासह तुर्कीचे पीएम आणि कतारचे शेख मोहम्मद बिन हमाद अल ताहिनी यांची नावे या यादीत समाविष्ट आहेत. हा कार्यक्रम 14 फेब्रुवारी रोजी दुबई (Dubai) येथे होणार आहे.
वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटमध्ये बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार शाहरुख खानही बोलणार आहे. हे भाषण सुमारे 15 मिनिटांचे असणार आहे. या खास प्रसंगी शाहरुख मेकिंग ऑफ अ स्टार या थीमवर बोलणार आहे. या चर्चेला ‘द मेकिंग ऑफ अ स्टार: अ कॉन्व्हर्सेशन विथ शाहरुख खान’ असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये शाहरुख खान त्याच्या स्टारडम आणि आयुष्याच्या प्रवासाविषयी बोलणार आहे. या परिषदेला नरेंद्र मोदीही संबोधित करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
2023 हे एक उत्तम वर्ष : 2023 हे वर्ष शाहरुखसाठी खूप चांगले होते. गेल्या वर्षी त्याने ‘पठाण’, ‘जवान’, ‘डँकी’ सारखे उत्कृष्ट चित्रपट दिले. शाहरुखच्या ‘पठाण’ आणि ‘जवान’ने बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई करून अनेक विक्रम मोडले. या शानदार चित्रपटांनंतर शाहरुख खानचे चाहते त्याच्या पुढच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण, शाहरुखने अद्याप त्याच्या पुढच्या चित्रपटाबाबत कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.
‘रमा राघव’ मालिकेत दुहेरी धमका, सुरू होणार रमाच्या आयुष्याचा नवा टप्पा
शाहरुख खानचे रेड चिलीज एंटरटेनमेंट: या बातम्यांदरम्यान शाहरुख खानच्या कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंटबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. रेड चिलीजचे सीओओ गौरव वर्मा यांनी कंपनी सोडली आहे. गौरव वर्मा गेल्या 9 वर्षांपासून रेड चिलीजमध्ये काम करत होता. मिळालेल्या माहितीनुसार, गौरव वर्माला काहीतरी नवीन करायचे होते. या कारणामुळे त्याने कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रेड चिलीजने एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आणि त्याला (गौरव वर्मा) त्याच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.