Download App

Yami Gautam: गूड न्यूज! ‘आर्टिकल 370’ फेम अभिनेत्री बनली आई, यामी गौतम-आदित्य धरला पुत्ररत्न प्राप्त

Yami Gautam: यामी गौतम आपल्या प्रेग्नेन्सीची माहिती दिली होती. त्यांनतर चाहते फारच आनंदी झाले होते. आता यामी गौतमने मुलाला जन्म दिला आहे.

Yami Gautam Blessed with Baby Boy: सध्या मनोरंजन सृष्टीत अनेक गुड न्यूज समोर येत आहेत. एकेकीकडे काही कलाकार लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. तर दुसरीकडे काही कलाकार नव्या पाहुण्याचं स्वागत करत आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam)  आपल्या प्रेग्नेन्सीची माहिती दिली होती. त्यांनतर चाहते फारच आनंदी झाले होते. आता यामी गौतमने मुलाला जन्म दिला आहे. (Social media) यामी आणि तिचा पती आदित्य धर (Aditya Dhar) यांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्यांनी पोस्ट शेअर करून मुलाच्या जन्माची माहिती दिली. यासोबतच तिने आपल्या गोंडस बाळाचे नाव देखील उघड केले आहे.


यामीच्या मुलाचे नाव काय?

या कपलने पोस्ट करून डॉक्टर आणि मीडियाचे आभार मानले आहेत. यासोबतच या कपलने सांगितले की त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव वेदविद ठेवले आहे. त्यांच्या मुलाचा जन्म अक्षय्य तृतीयेला झाला. वेदविद या नावाचा अर्थ वेदांचे ज्ञान असलेला. यामी आणि आदित्य आई- बाबा झाल्याबद्दल चाहते त्यांचे अभिनंदन करत आहेत. सेलिब्रिटीही कमेंट करत आहेत आणि अभिनंदन करत आहेत. अभिनेता रणवीर सिंगने लिहिले आहे की, खूप आणि खूप प्रेम. आयुष्मान खुराना यांनी लिहिले आहे की, खूप अभिनंदन.

यामी गौतम आणि आदित्य धरबद्दल बोलायचे झाले तर या दोघांनी उरी: द सर्जिकल स्ट्राइक या चित्रपटात एकत्र काम केले होते. यामी या चित्रपटात अभिनेत्री होती. आदित्य चित्रपटाचा दिग्दर्शक होता. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडल्याचे या कपलने सांगितले होते. दोघांमध्ये आधी मैत्री आणि नंतर प्रेम. दोघांनीही आपली लव्हस्टोरी गुपित ठेवली होती.

Tabu: पवन कल्याणच्या ‘या’ चित्रपटातून अभिनेत्री तब्बूचा पत्ता कट? तर साऊथ अभिनेत्रीनी घेतली जागा

4 जून 2021 रोजी त्यांचे लग्न झाले. त्यांचे लग्न एका खाजगी समारंभात पार पडले, जिथे फक्त कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. या कपलने हे लग्न अगदी साधेपणाने केले होते. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता हे कपल सुखी वैवाहिक जीवन जगत आहे. कामाच्या आघाडीवर, यामी शेवटची ‘आर्टिकल 370’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाची पटकथा आदित्य धर यांनी स्वतः लिहिली होती. आदित्य या चित्रपटाचा निर्माताही होता.

follow us