Download App

‘आर्टिकल 370’चं दुसऱ्या आठवड्यात दमदार पदार्पण! बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई

Article 370 Box Office Collection Day 15: राजकीय थ्रिलर ‘आर्टिकल 370’ (Article 370 Movie) मुख्य भूमिकेत यामी गौतमने (Yami Gautam) दोन आठवड्यांपासून थिएटरमध्ये धुमाकूळ घातला आहे. (Box Office) या चित्रपटाने बजेटपेक्षा कितीतरी पटीने अधिक कमाई केली आहे. आता हा चित्रपट रिलीजच्या तिसऱ्या आठवड्यात दाखल झाला आहे आणि अजूनही बॉक्स ऑफिसवर त्याची पकड कायम आहे. ‘आर्टिकल 370’ ने रिलीजच्या 15 व्या दिवशी किती कलेक्शन केले आहे चला तर मग जाणून घेऊया?

‘आर्टिकल 370’ रिलीज झाल्याच्या 15 व्या दिवशी किती कमाई झाली? पीएम मोदींनी यामी गौतम, प्रियामणी आणि अरुण गोविल यांच्या जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 हटविण्यावर आधारित ‘आर्टिकल 370’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचेही कौतुक केले. या चित्रपटातून लोकांना योग्य माहिती मिळेल हे चांगले आहे, असे पंतप्रधान म्हणाले होते. यानंतर या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झाली होती. ‘आर्टिकल 370’ ची सुरुवात थोडी संथ झाली असली तरी त्यानंतर चित्रपटाने वेग पकडला आणि मोठी कमाई केली. या चित्रपटाने बजेटपेक्षा खूप जास्त कमाई केली आहे.

‘आर्टिकल 370’च्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाचे पहिल्या आठवड्यात 35.6 कोटींचे कलेक्शन होते. दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 22.3 कोटींची कमाई केली. आता ‘आर्टिकल 370’ रिलीजच्या तिसऱ्या आठवड्यात आहे आणि त्याच्या तिसऱ्या शुक्रवारी म्हणजेच 15व्या दिवसाच्या कमाईचे आकडेही आले आहेत. Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘आर्टिकल 370’ ने रिलीजच्या 15 व्या दिवशी 1.65 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. यासह, ‘आर्टिकल 370’ची 15 दिवसांची एकूण कमाई आता 59.55 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

अभिनेते सुनील तावडेनी केला लेकाच्या चित्रपटाचं खास सेलिब्रेशन, शेअर केले खास व्हिडिओ

‘आर्टिकल 370’ ने जगभरात किती कमाई केली? आदित्य सुहास जांभळे दिग्दर्शित आणि आदित्य धर निर्मित,’आर्टिकल 370′ ला देशांतर्गत बाजारात मोठा प्रतिसाद मिळाला आहे, तर जगभरातील प्रेक्षकांनी या चित्रपटाला खूप पसंती दिली आहे. चित्रपटाने दोन आठवड्यांत जगभरात 77 कोटींहून अधिक कमाई केली आहे आणि आता तो 100 कोटींचा आकडा गाठण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. ‘आर्टिकल 370’ लवकरच जगभरात 100 कोटींचा टप्पा ओलांडेल अशी अपेक्षा आहे.

‘आर्टिकल 370’ गेल्या दोन आठवड्यांपासून बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे, मात्र आता अजय देवगणचा ‘शैतान’या चित्रपटाला टक्कर देण्यासाठी आला आहे. ‘शैतान’ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 14 कोटींच्या कलेक्शनसह दमदार ओपनिंग केली आहे. अशा परिस्थितीत ‘शैतान’ आता ‘आर्टिकल 370’च्या कमाईच्या ब्रेक लावू शकतो. आता ‘शैतान’समोर ‘आर्टिकल 370’ कितपत कलेक्शन करू शकते हे पाहायचे आहे.

follow us