अभिनेते सुनील तावडेनी केला लेकाच्या चित्रपटाचं खास सेलिब्रेशन, शेअर केले खास व्हिडिओ

 अभिनेते सुनील तावडेनी केला लेकाच्या चित्रपटाचं खास सेलिब्रेशन, शेअर केले खास व्हिडिओ

Shubhankar Tawde Kanni Movie Celebration: अभिनेता शुभंकर तावडे (Shubhankar Tawde) हा कायम त्याचा फॅशन आणि उत्तम अभिनय करून चर्चेत असतो. सोशल मीडियावर (social media) त्याचा फॅशन स्टाईलच्या अनोख्या चर्चा असताना नुकताच त्याच्या आगामी “कन्नी” (Kanni Movie) चित्रपटाचा प्रीमियर पार पडला (Marathi Movie) आणि शुभंकरला एक खास कौतुकाची थाप सुद्धा मिळाली आहे.

दिग्गज अभिनेते सुनील तावडे (Sunil Tawde) यांनी आपल्या लेकाला या चित्रपटासाठी शुभेच्छा देत त्याचा अभिनयाचं खास कौतुक केलं आहे. प्रत्येक मुलासाठी त्याचा बाबाकडून ही खास कौतुकाची थाप मिळणं बेस्ट असतं आणि हेच कौतुक प्रेम शुभंकरला त्याच्या बाबाकडून मिळालं आहे.

सुनील तावडे हा चित्रपट बघून हसले कुठेतरी थोड भावूक झाले आणि आपल्या मुलाचं तोंडभरून त्यांनी कौतुक केलं आहे. अभिनय विश्वात ही बाप लेकाची जोडी कायम सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी असते आणि चित्रपटाच्या प्रीमियर मध्ये देखील या दोघांच्या अनोख्या बॉण्डने सगळ्यांना आपलंसं केलं.

‘शैतान’ ची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात, पहिल्या दिवशी चित्रपटाने केली ‘इतकी’ कमाई

“कन्नी” मधून पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकायला शुभंकर तयार झाला असून येणाऱ्या वर्षात तो अनेक नवनवीन प्रोजेक्ट्समधून दिसणार आहे. यावर दिग्दर्शक समीर जोशी म्हणतात, ” पतंग आणि मांजाला जोडून ठेवण्याचे काम ज्याप्रमाणे ‘कन्नी’ करते तसेच आपल्या आयुष्यातही मैत्री, प्रेम आणि स्वप्नं यांना जोडून ठेवणारी एक ‘कन्नी’ असणे खूप महत्वाचे आहे. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर याचे महत्व आपल्याला कळते. या चित्रपटातून हेच दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे, जो तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत, मित्रमैत्रिणींसोबत आवर्जून पाहावा. ही ‘कन्नी’ सर्वांना एकत्र बांधण्यासाठी 8 मार्चपासून चित्रपटगृहात येणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज