Download App

Yami Gautam : यामी गौतम होणार आई?, आदित्यच्या घरी लवकरच हलणार पाळणा!

Yami Gautam Pregnancy: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री यामी गौतमसाठी (Yami Gautam) हे वर्ष आनंदाचे जाणार आहे. यामी आणि आदित्य धर (Aditya Dhar) यांच्या घरी लवकरच एका छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. यामी गरोदर असून या वर्षी ती एका बेबीला जन्म देणार आहे. यामीला प्रेग्नेंसी होऊन साडेपाच महिने झाले आहेत. यामी आणि आदित्यने आतापर्यंत गरोदरपणाच्या वृत्तावर मौन बाळगले आहे. याबाबत त्यांनी अद्याप कोणालाही सांगितले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार यामीला जेव्हापासून तिच्या प्रेग्नेंसीबद्दल माहिती मिळाली तेव्हापासून ती खूप आनंदात आहे. कदाचित ती मे महिन्यात मुलाला जन्म देणार असल्याचे सांगितले जात आहे. घरच्यांनी आत्तापर्यंत सर्वच गोष्टी लपवून ठेवलं होतं.

प्रेग्नंट असल्याची बातमी समोर आली होती: नुकतचं यामी गौतम पती आदित्य धरसोबत सार्वजनिक ठिकाणी दिसली. त्यानंतर तिच्या प्रेग्नेंसीच्या जोरदार चर्चा होत होत्या. कारण ती दुपट्ट्याने पोट लपवताना दिसली होती. यामी आणि आदित्य लवकरच प्रेग्नेंसीची घोषणा करणार आहेत, कारण ती लवकरच तिच्या थ्रिलर चित्रपटाचे प्रमोशन करणार आहे.


‘आर्टिकल 370’ मध्ये यामी गौतम मुख्य भूमिकेत दिसत असून या चित्रपटाची निर्मिती आदित्यने केली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज होणार असून 23 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामी आणि आदित्य चित्रपटाचे प्रमोशन सुरू होण्यापूर्वीच त्यांच्या प्रेग्नेंसीची घोषणा करणार आहेत.

Yami Gautam Pregnancy : यामी गौतम प्रेग्नंट? Viral व्हिडीओमुळे चर्चेला उधाण

यामी गौतम आणि आदित्य धर यांचा विवाह 4 जून 2021 रोजी झाला होता. दोघांनी 2 वर्षे डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. दोघेही उरी: सर्जिकल स्ट्राइकच्या सेटवर भेटले आणि तिथेच एकमेकांच्या प्रेमात पडले. आता लग्नाच्या 3 वर्षानंतर हे जोडपे आई-बाबा होणार आहेत.

follow us