Download App

Box office collection: ‘आर्टिकल 370’ गाडी सुसाट, तर ‘क्रॅक’च्या कमाईला ब्रेक

Article 370 Box Office Collection Day 5: यामी गौतमचा (Yami Gautam) नुकताच रिलीज झालेला ‘आर्टिकल 370’ (Article 370 Movie) चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि यासोबतच चित्रपटाला चांगली ओपनिंग मिळाली. ‘आर्टिकल 370’ ने वीकेंडलाही जोरदार कमाई केली. मात्र, सोमवारी चित्रपटाच्या कमाईत घट झाली. यामी गौतमच्या चित्रपटाच्या खात्यात मंगळवारी म्हणजेच पाचव्या दिवशी किती कोटी जमा झाले चला तर मग जाणून घेऊया?

‘आर्टिकल 370’ रिलीज झाल्याच्या 5 व्या दिवशी किती जमा झाले? आदित्य सुहास जांभळे दिग्दर्शित ‘आर्टिकल 370’ चित्रपट 23 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमधील दहशतवादविरोधी कारवायाभोवती हा चित्रपट फिरतो. ‘आर्टिकल 370’ ला विद्युत जामवालच्या ॲक्शनपॅक्ड स्पोर्ट्स ड्रामा फिल्म ‘क्रॅक’ रिलीजच्या पहिल्याच दिवशी टक्कर द्यावी लागली. मात्र, यामीचा चित्रपट बॉक्स ऑफिसच्या शर्यतीत विद्युतच्या चित्रपटापेक्षा खूप पुढे गेला आहे.

‘आर्टिकल 370’ च्या कमाईबद्दल बोलायचे झाल्यास, सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 5.9 कोटी रुपये कमावले, दुसऱ्या दिवशी चित्रपटाचे कलेक्शन 7.4 कोटी रुपये आणि तिसऱ्या दिवशी, रविवारी या चित्रपटाने 9.6 कोटींची कमाई केली. चौथ्या दिवशी, सोमवारी, चित्रपटाने 66.15 टक्क्यांच्या घसरणीसह 3.25 कोटी रुपयांची कमाई केली. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पाचव्या दिवसाच्या म्हणजेच पहिल्या मंगळवारच्या कमाईचे प्रारंभिक आकडे आले आहेत.

Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘आर्टिकल 370’ ने रिलीजच्या 5 व्या दिवशी म्हणजेच पहिल्या मंगळवारी 3.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह, ‘आर्टिकल 370’ चे पाच दिवसांचे एकूण कलेक्शन आता 29.40 कोटी रुपये झाले आहे.

BREAKING : अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमीचा नवी दिल्ली पुरस्कार जाहीर!

‘आर्टिकल 370’ ने जगभरात किती कमाई केली? ‘आर्टिकल 370’ ला जगभरातील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यासोबतच हा चित्रपट जगभरात चांगले कलेक्शन करत आहे. यामी गौतमने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर चित्रपटाच्या तीन दिवसांच्या जगभरातील कमाईचे आकडे शेअर केले आहेत. त्यानुसार या चित्रपटाने तीन दिवसांत जगभरात 44.60 कोटींची कमाई केली आहे. पाचव्या दिवशी चित्रपट 40 कोटींचा आकडा गाठू शकतो.

‘आर्टिकल 370’ कथा ‘आर्टिकल 370’चे दिग्दर्शन आदित्य सुहास जांभळे यांनी केले असून यामी गौतमचे पती आदित्य धर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. यामी गौतमने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. ‘आर्टिकल 370’ मध्ये प्रियमणी आणि अरुण गोविल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट काश्मीरमधील कलम 370 हटवणे आणि दहशतवादावर आधारित आहे.

follow us

वेब स्टोरीज