Pathan : रिलीज होऊन सहा आठवडे, यशराज फिल्म्सच्या पठानचा करिश्मा कायम !

मुंबई : सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित यशराज फिल्म्सचा ( Yashraj Films) पठान ( Pathan) हा एक ऐतिहासिक ब्लॉकबस्टर चित्रपट आहे. या सिनेमाने आजपर्यंत 1041.25 कोटींची कमाई केली आहे. जगभरात सर्वाधिक कमाई करणारा पठाण हा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे. ‘पठान’ प्रदर्शित झाल्यापासून देशांतर्गत आणि परदेशी बॉक्स ऑफिसवर शानदार कामगिरी करत आहे. सहाव्या गुरूवारीही ‘पठान’ने बॉक्स ऑफिसवर […]

Pathan

Pathan

मुंबई : सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित यशराज फिल्म्सचा ( Yashraj Films) पठान ( Pathan) हा एक ऐतिहासिक ब्लॉकबस्टर चित्रपट आहे. या सिनेमाने आजपर्यंत 1041.25 कोटींची कमाई केली आहे. जगभरात सर्वाधिक कमाई करणारा पठाण हा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे. ‘पठान’ प्रदर्शित झाल्यापासून देशांतर्गत आणि परदेशी बॉक्स ऑफिसवर शानदार कामगिरी करत आहे. सहाव्या गुरूवारीही ‘पठान’ने बॉक्स ऑफिसवर पुन्हा दमदार कमाई केली.

पठाणने आता एकट्या परदेशात $47.41 दशलक्ष डॉलर्सची कमाई केली आहे, तर भारतातील नेट कलेक्शन 538.01 कोटी एवढे आहे. पठाण सिनेमाची जगभरातील एकूण कमाई 1041.25 कोटी आहे. यापैकी भारतात 651.25 कोटी तर परदेशात 390 कोटी रुपये या सिनेमाने कमावले आहेत.

Horror Film Festival : मुंबईकरांची दातखिळी बसणार, आजपासून रंगणार हॉरर फिल्म फेस्टिवल

या सिनेमामध्ये बॉलिवुडचा किंग खान शाहरुख खान हा प्रमुख भूमिकेत आहे. तर दीपिका पदुकोन, जॉन अब्राहम हे दोन कलाकार देखील प्रमुख भूमिकेत आहेत. दरम्यान या सिनेमाच्या सुरुवातीला बराच वाद झाला होता. दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकनीवरुन या सिनेमावर आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर सिनेमात बदल करुन हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला होता.

Exit mobile version