Yashwantrao Chavan Theater: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. (Yashwantrao Chavan Theater) नवनिर्वाचित नियामक मंडळ व कार्यकारी समितीने पदभार स्विकारल्यानंतर पहिल्याच संपन्न झालेल्या दोन्ही सभांमध्ये अध्यक्ष प्रशांत दामले (Prashant Damle) यांच्या नेतृत्वाखाली यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून बंद असलेले नाट्यसंकुल पुन्हा चालू व्हावे अशी मागणी अनेक सभासदांची व रसिकांची होती.
परिषदेचे तहयात विश्वस्त शरद पवार, विश्वस्त उदय सामंत, शशी प्रभू यांनी संमती दिली आणि नवनिर्वाचित नियामक मंडळाने संकुल दुरूस्त करून रसिकांसाठी व नाट्य कलावंतांसाठी खुले करावे, असा ठराव केला व नाट्य संकुलाच्या दुरुस्तीचे कामकाज जोमाने सुरू झाले आहे. येत्या १४ जूनला नाट्यसंकुल सुरू होणार आहे, यासाठी युध्दपातळीवर दुरूस्तीचे कामकाज सुरू असल्याची माहिती अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली. या दुरूस्तीच्या कामकाजासाठी विशेष परिश्रम घेतले जाणार आहे.
https://letsupp.com/entertainment/a-man-tried-to-rape-actress-and-kathak-dancer-archana-joglekar-56018.html
नाट्य परिषदेचे पदाधिकारी, सदस्य उभे राहून कामकाज करून घेत आहेत. यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल पूर्वीप्रमाणे सुरू होऊन येथे नाटक, संगीत कार्यक्रम, सभा व सांस्कृतिक उपक्रमांसाठी १ जुलै पासून रसिकांच्या सेवेत रुजू होईल, अशी माहिती प्रमुख कार्यवाह अजीत भुरे यांनी दिली. नाट्य संकुलात नाट्यगृह, नाटकाच्या तालमीसाठी अद्ययावत तालीम हॉल, छोट्या कार्यक्रमांसाठी मंच, लायब्ररी, नाट्य कला अकादमी, कलावंतांसाठी निवास व्यवस्था व नाट्यअनुषंगिक सर्व घटकांसाठी नाट्यपरिषद पुढील काळात वाटचाल करणार आहे.