Download App

Video : ‘स्टार प्रवाह’च्या ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत झळकणार ‘हा’ लोकप्रिय अभिनेता, जबरदस्त प्रोमो पाहा

Yed Lagla Premach New Promo: स्टार प्रवाहवर सुरु होणाऱ्या येड लागलं प्रेमाचं मालिकेविषयी कमालीची उत्सुकता आहे.

  • Written By: Last Updated:

Yed Lagla Premach New Promo: स्टार प्रवाहवर सुरु होणाऱ्या येड लागलं प्रेमाचं मालिकेविषयी कमालीची उत्सुकता आहे. (Yed Lagla Premach) मालिकेच्या प्रोमोमध्ये राया आणि मंजिरी म्हणजेच अभिनेता विशाल निकम आणि अभिनेत्री पूजा बिरारी यांना आपण भेटलोय. लवकरच मालिकेतलं (New Promo) आणखी एक महत्त्वाचं पात्र म्हणजेच इन्सपेक्टर जय घोरपडे (Marathi serial) प्रेक्षकांसमोर येणार आहे. जय कामात हुशार असला तरी लाचखाऊ आहे. तो जिथे रहातो तिथे त्याचा दबदबा आहे.

Yed Lagla Premach | नवी मालिका ‘येड लागलं प्रेमाचं’  | साहेब सोडू नका ह्याला! #starpravah

लोकांना मदत करणं हे त्याचं कर्तव्य आहे असं तो सांगतो पण एकही काम स्वार्थाशिवाय करत नाही. अडचणीच्या वेळी मदत केल्याचं तो भासवतो पण अडकवणाराही बऱ्याचदा तोच असतो. रिअ‍ॅलिटी शोज गाजवलेला लोकप्रिय अभिनेता जय दुधाणे इन्सपेक्टर जय घोरपडेची भूमिका साकारणार आहे. अभिनेता जय दुधाणे या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच पोलिसाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या अनुभवाविषयी सांगताना तो म्हणाला, ‘मी पहिल्यांदा पोलिस इन्सपेक्टरची भूमिका साकारतोय. माझे काका पोलीस खात्यात असल्यामुळे त्यांचं मार्गदर्शन मिळत आहे. आव्हान खूप मोठं आहे. व्यायाम माझं पॅशन आहे.

SSMB 29: वीरेन स्वामी महेश बाबूच्या चित्रपटाचा भाग नसणार? निर्मात्यांनी केला मोठा खुलासा

या भूमिकेसाठी शरीरयष्ठीवर जास्त मेहतन घेतोय. विशालसोबत याआधी काम केल्यामुळे आमची ओळख होतीच. पूजासोबत पण छान मैत्री जमली आहे. आम्हा तिघांचे सीन्स खूप छान होत आहेत. विशाल आणि पूजा सहकलाकार म्हणून उत्तम आहेत. महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी अर्थातच स्टार प्रवाहसोबतची पहिलीच मालिका असल्यामुळे मी जरा जास्त उत्सुक आहे. मालिकेमुळे घराघरात पोहोचता येतं. त्यामुळे प्रेक्षकांची पसंती मिळावी हीच अपेक्षा आहे. तेव्हा पाहायला विसरू नका नवी मालिका येड लागलं प्रेमाचं 27 मे पासून रात्री 10 वाजता स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे.

follow us