Download App

‘येक नंबर’ चित्रपट करणार धमाका; प्रतिसाद मिळत असल्याने शोज् वाढविले

चित्रपटाचे तेजस्विनी पंडित, वरदा नाडियाडवाला निर्माते आहेत. तर झी स्टुडिओजच्या उमेश कुमार बन्सल यांचेही या चित्रपटाला सहकार्य लाभले आहे.

  • Written By: Last Updated:

Yek Number Marathi Movie : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आधारित असलेला ‘येक नंबर’ (Yek Number) चित्रपट हा 10 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला आहे. झी स्टुडिओज् आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित, राष्ट्रीय पुरस्कार विजेते राजेश मापुस्कर दिग्दर्शित हा चित्रपट आहे. या चित्रपटाला आता प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यामुळे काही शहरांमध्ये या चित्रपटाचे शो ही वाढविण्यात आले आहेत. प्रेक्षकांचा असाच प्रतिसाद मिळाल्यास हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकणार आहे.

Yek Number Movie: ‘जाहीर झालं जगाला…’, ‘येक नंबर’ सिनेमातील प्रेमगीत प्रदर्शित, पाहा…

10 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कमी प्रतिसाद मिळाला होता. नवरात्री व दसऱ्याच्या सणामुळे प्रेक्षक चित्रपटगृहाकडे वळाले नव्हते. पण रविवारी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतर चित्रपटाचे शोजही वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे आता ‘येक नंबर’ धमाका करणार असल्याचे दिसतेय. या चित्रपटाचे पोस्टर आल्यापासूनच या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली होती. त्यात उत्सुकता वाढवली ती धमाकेदार ट्रेलरने. चित्रपटाची भव्यता ट्रेलर, गाण्यांमधून दिसतच आहे. प्रेक्षकही या चित्रपटाचे भरभरून कौतुक करत आहेत.

चित्रपटाचा पहिला भाग काहींना भावला आहे. तर काहींना पूर्वार्ध अधिक भावला आहे. अनेकांनी धैर्यच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. तर अनेकांना तेजस्विनी पंडितची धडाडीची व्यक्तिरेखेचे कौतूक होत आहे. हा चित्रपट राज ठाकरे यांची विचारधारा सांगणारा आहे. चित्रपटाचे तेजस्विनी पंडित, वरदा नाडियाडवाला निर्माते आहेत. तर झी स्टुडिओजच्या उमेश कुमार बन्सल यांचेही या चित्रपटाला सहकार्य लाभले आहे. राजेश मापुस्कर दिग्दर्शित या चित्रपटात धैर्य घोलप, सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.तर सिद्धार्थ जाधव, पुष्कर श्रोत्री, आनदं इंगळे, संजय मोने आणि निलेश दिवेकर यांच्याही भूमिका चित्रपटात आहे. अजय-अतुल यांचे संगित आहे.

follow us