Download App

Shah Rukh Khan च्या एका घड्याळाच्या किंमतीत तुम्ही घ्याल बंगला… किंमत ऐकून व्हाल शॉक

  • Written By: Last Updated:

मुंबई : पठाण सिनेमा सुपर- डुपर हीट झाल्याने बॉलिवूडचा किंगखान शाहरुख खानचे (Shah Rukh Khan) अनेकांनी अभिनंदन केले. मात्र सध्या शाहरुख सिनेमामुळे नव्हे तर त्याच्या एका महागड्या घड्याळामुळे चर्चेत आहे. विशेष म्हणजे तुम्ही या घडाळ्याच्या किंमतीत एक चक्क बंगला खरेदी करू शकता. हे ऐकूनच तुम्हाला समजले असले की या घडाळ्याची किंमत काय असेल. एका वेबसाइटनुसार शाहरुखच्या या घड्याळाची किंमत 4.7 कोटी रुपये आहे.

‘Valentine’s Day’ बनवा खास, WhatsApp च्या या खास वैशिष्ट्यांसह

सुपरस्टार शाहरुख खान जगातील चौथ्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती आहे. शाहरुखची एकूण संपत्ती $770 दशलक्ष असल्याचे सांगण्यात आले. शाहरुख खान अलीकडेच ‘पठाण’शी संबंधित एका कार्यक्रमात दिसला, जिथे त्याने निळ्या रंगाचे मनगटी घड्याळ (Watch) घातले होते. त्याचे काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शाहरुखच्या या निळ्या रंगाच्या घड्याळाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. शाहरुखचे घड्याळ Audemars Piguet चे होते. हे त्याचे Royal Oak Perpetual Calendar घड्याळ आहे, ज्याची किंमत ₹4.98 कोटी आहे. एका वेबसाइटनुसार त्याची किंमत 4.7 कोटी रुपये आहे.

शाहरुख 200 कोटींच्या बंगल्यात राहतो
शाहरुख खान लक्झरी लाईफसाठी देखील ओळखला जातो, मुंबईत तो ज्या मन्नतमध्ये राहतो तो बंगला 200 कोटी रुपयांचा आहे. दिल्ली, दुबई येथे त्यांची अनेक आलिशान घरे आहेत. शाहरुखकडे बीएमडब्ल्यू 6 सीरीज, बीएमडब्ल्यू 7 सीरीज, ऑडी यासह अनेक लक्झरी कार आहेत.

पठाण नंतर जवान येणार…
‘पठाणच्या’ यशानंतर शाहरुख खानचा नवा चित्रपट ‘जवान’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. जवान या चित्रपटात साऊथ सुपरस्टार नयनतारा लीड रोल साकारत असून शाहरुख खान बरोबर या चित्रपटात विजय सेतुपती, प्रिया मणिक, सान्या मल्होत्रा अशी स्टार मंडळी दिसणार आहे.

Tags

follow us