Rubab : शेखर बापू राणखांबे दिग्दर्शित प्रेम नाट्य अन् भावनांचा सुरेख मिलाफ असलेला रुबाब (Rubab) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यंदाच्या सुरुवातीला थिएटरमध्ये प्रेक्षकांशी नाळ जोडणारा ‘रुबाब’ आता आपल्या डिजिटल प्रीमियरसह अधिक व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास सज्ज आहे. प्रेम, नाट्य आणि भावनांचा सुरेख मिलाफ असलेला हा चित्रपट स्वाभिमान, नातेसंबंध आणि आपल्याला घडवणाऱ्या निर्णयांची कथा मांडतो.
‘रुबाब’च्या केंद्रस्थानी आहे सूरज आणि वैशाली यांचा प्रवास—दोन ठाम स्वभावाचे व्यक्ती, ज्यांची आयुष्ये प्रेमामुळे एकत्र येतात; पण परिस्थिती आणि त्यांच्या स्वभावातील अहंकारामुळे त्यांची नाती कसोटीला लागतात. त्यांच्या नात्याचा प्रवास पुढे जात असताना, अभिमान, अहंकार आणि भावना कशा नात्यांना मजबूतही करतात आणि आव्हानही देतात, हे चित्रपट दाखवतो. प्रेम, अॅक्शन आणि भावनिक क्षणांचा समतोल साधत ‘रुबाब’ नात्यांतील चढ-उतार टिपतो आणि आत्मसन्मान व ओळखीचे महत्त्व अधोरेखित करतो.
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय…लष्करप्रमुखांना तडकाफडकी हटवलं, ख्रिस्तोफर ले यांची नियुक्ती
संभाजी ससाणे, शीतल पाटील, विशाल शिर्टोडे, अभिजीत साकटे आणि सिमरन खेडकर यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाला थिएटरमध्ये त्याच्या प्रभावी कथानक आणि अभिनयासाठी चांगली दाद मिळाली. आता डिजिटल प्रीमियरमुळे ‘रुबाब’ जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार असून मराठी कथाकथनाला एक व्यापक व्यासपीठ मिळणार आहे.
ZEE5 वरील डिजिटल प्रीमियरबद्दल बोलताना, हेमां V. R., चीफ चॅनल ऑफिसर – झी मराठी आणि बिझनेस हेड – मराठी ZEE5 म्हणाल्या “रुबाब” हा नात्यांचा, आपल्या अभिमानाचा, आपण जपलेल्या प्रेमाचा आणि आपल्याला घडवणाऱ्या भावनांचा एक हृदयस्पर्शी उत्सव आहे. सांस्कृतिक पार्श्वभूमीवर आधारित ही कथा अतिशय जवळची आणि वास्तव वाटते. मराठी सिनेमाची ओळख असलेली प्रामाणिकता आणि वास्तववाद यातून दिसून येतो, आणि ही प्रभावी कथा मराठी ZEE5 द्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताना आम्हाला अभिमान वाटतो.
मुसळधार पावसाने पुणे जलमय; जंगली महाराज रोड, स्वारगेट, वारजे भागात पाणी साचलं, वाहनचालक त्रस्त
दिग्दर्शक शेखर बापू राणखांबे म्हणाले, रुबाब’ ही प्रेम, आत्मसन्मान आणि भावना व अहंकार यांच्यातील संघर्षात लोक कोणते निर्णय घेतात, याची कथा आहे. ही कथा खूप वास्तवातून आलेली आहे, आणि थिएटरमध्ये प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद आमच्यासाठी खूप खास होता. आता हा चित्रपट मराठी ZEE5 वरून अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार याचा आनंद आहे”
संभाजी ससाणे म्हणाले “सूरज ही भूमिका साकारताना खूप वेगळा अनुभव आला, कारण त्याच्यात आत्मविश्वास आणि नाजूकपणा दोन्ही आहेत. ही कथा अनेकांना स्वतःची वाटेल अशी आहे, आणि आता जागतिक स्तरावर प्रेक्षक ‘रुबाब’ पाहतील यासाठी मी उत्सुक आहे. शीतल पाटील म्हणाल्या “वैशाली ही एक मजबूत आणि स्वतंत्र व्यक्तिरेखा आहे, जी आपल्या मतांवर ठाम उभी राहते—आणि हेच मला या भूमिकेकडे आकर्षित झालं. ‘रुबाब’ नात्यांतील भावनिक स्तर अतिशय सुंदरपणे मांडतो, आणि या प्रवासाचा भाग होणं माझ्यासाठी खूप खास आहे. प्रेम, नाट्य आणि वास्तववादी कथानकाचा संगम असलेला ‘रुबाब’ सर्व वयोगटातील प्रेक्षकांसाठी एक उत्तम अनुभव ठरणार आहे.
