लवकरच अभिनेता आदिनाथ कोठारे दिसणार एका नव्या भूमिकेत !
Adinath Kothare आदिनाथ कोठारे लवकरच झी मराठी आणि कोठारे व्हिजनच्या नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार असून, त्यांच्या भूमिकेबाबतची उत्सुकता वाढली आहे.
आदिनाथ ने सोशल मीडिया वरून क्लैप चा फोटो शेयर करत Coming soon अस कैप्शन देत प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. झी मराठी आणि कोठारे व्हिजन आगामी काळात काहीतरी खास घेऊन येणार असल्याची चर्चा असून यात आदिनाथ कोणत्या भूमिकेत दिसणार हे बघणं उत्कंटावर्धक आहे.
एकीकडे बॉलिवूड मध्ये बिग बजेट फिल्म्स तर दुसरीकडे टीव्ही विश्वात तो काय भूमिका साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. आज या नव्या कामाचा मुहूर्त संपन्न झाला असून हा नवीन प्रोजेक्ट काय ? कोण कलाकार यात दिसणार ? याची उत्तर प्रेक्षकांना लवकरच मिळतील !