Download App

झी टॉकीजचा हँडलूम कॅन्टर यंदाच्या वारीत सज्ज,महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते झाला शुभारंभ!

Handloom Canter : वारी सुरू झाली… “विठ्ठल-विठ्ठल!” असा जयघोष करत वारकऱ्यांनी माउलीला साद घातली. आणि यंदा, या वारीत एका अनोख्या

  • Written By: Last Updated:

Handloom Canter : वारी सुरू झाली… “विठ्ठल-विठ्ठल!” असा जयघोष करत वारकऱ्यांनी माउलीला साद घातली. आणि यंदा, या वारीत एका अनोख्या भक्तिपथाचं विणकाम सुरू झालं आहे — शब्दांनी नव्हे, तर प्रत्यक्ष धाग्यांनी! झी टॉकीजचा ‘हँडलूम कॅन्टर’ (Handloom Canter) सध्या फळटण फाट्याजवळ पोहोचला असून, शेकडो भाविक प्रेमाने आणि श्रद्धेने आपल्या हातून विठोबासाठी वस्त्र विणत आहेत. हा कॅन्टर वारी मार्गे पुढे पुढे जात राहील आणि प्रत्येक ठिकाणी वारकऱ्यांना भक्तीचा धागा प्रत्यक्ष हातात घेण्याची संधी मिळेल.

शिस्त, श्रद्धा आणि समर्पणाचा प्रारंभ

या भक्तिपूर्ण उपक्रमाचं उद्घाटन महाराष्ट्रातील महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडलं. वारीमध्ये हजारो महिलांची सुरक्षा राखणाऱ्या या अधिकाऱ्यांचं प्रतिकात्मक आणि सन्मानपूर्वक प्रतिनिधित्व यामुळे श्रद्धा आणि समाजभान यांची एक सुंदर सांगड घालण्यात आली आहे.

वारीतून चालणारी श्रद्धा… आता हातातून विणली जातेय

झी टॉकीजचा ‘हँडलूम कॅन्टर’ हा एक अनोखा उपक्रम आहे, जिथे भाविक थेट विणकामात सहभागी होत आहेत. रुक्मिणी मातेकरिता नऊवारी साडी आणि श्री विठोबाराठी उपरणं प्रशिक्षित विणकरांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांच्या हस्ते विणलं जातंय. या वस्त्रांची पूर्ती झाल्यावर ती पंढरपूर मंदिरात अर्पण केली जाणार आहेत. हे केवळ वस्त्र नव्हे, तर लाखो भक्तांच्या मनाचा स्पर्श आहे.

कॅन्टरमधील अनुभव — भक्ती, कला आणि संवाद

या खास सजवलेल्या कॅन्टरमध्ये भाविकांसाठी खालील अनुभव खुला आहे:

१) थेट विणकामाचे डेमो
२) पारंपरिक पोशाख आणि वस्त्रांचं प्रदर्शन
३) कलाकारांचा सहभाग
४) श्रद्धा आणि संवाद यांचं अनुभवात्मक दालन

कॅन्टरच्या भिंती भगव्या कापडांनी सजवलेल्या आहेत, विणकामाच्या चौकट फ्रेम्स, पारंपरिक दिवे आणि मध्यभागी उभा केलेला मोठा चरखा —
हे सर्व मिळून एक जिवंत भक्तिपर गॅलरी निर्माण करतात.

वारकऱ्यांच्या भावना — हृदयाला भिडणारा अनुभव

पंढरपूरच्या उषाताई गायकवाड म्हणाल्या, “हे काम करताना असं वाटतंय, जसं विठोबाच्या चरणांना हात लावतोय. दरवर्षी चालायचं, पण यंदा हातही चालू लागले — श्रद्धेचं हे वेगळंच रूप आहे.” विणकाम करत असताना एका भाविकाने हरिपाठ गुणगुणायला सुरुवात केली, आणि आजूबाजूच्या वारकऱ्यांनी ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा जयघोष करत वातावरण पवित्र केलं. क्षणभर सगळं कॅन्टर पंढरीचंच मंदिर झालं.

पुढचा थांबा — बारड

वारी आणि हँडलूम कॅन्टर सध्या फळटण फाट्याजवळ कार्यरत आहे, येथून पुढे हा उपक्रम बारड (Barad) कडे रवाना होणार आहे. स्थानिक भाविक आणि माध्यम प्रतिनिधींनी त्या ठिकाणी उपस्थित राहून सहभाग नोंदवावा. Live अपडेट्ससाठी Zee Talkies च्या सोशल मीडियावर लक्ष ठेवावं.

तुमच्याही हातून विणूया भक्तीचा धागा

हा उपक्रम सर्व भाविकांसाठी खुला आहे.श्रद्धा फक्त मनात नको — ती हातातूनही प्रकट होवो.ज्यांना भक्तीचं काहीतरी प्रत्यक्ष करायचं आहे,
त्यांनी नक्की सहभागी व्हावं.

झी टॉकीजचे बवेश जानवलेकर यांनीही त्यांची भावना व्यक्त्त केली  “वारीतील प्रत्येक पाऊल ही श्रद्धा आहे…पण त्या पावलांनी विणलेलं वस्त्र — हे केवळ कापड नाहीतर भक्तीचं प्रतीक आहे.आणि ते मंदिरात अर्पण होणं म्हणजे लाखो माणसांच्या मनाचा स्पर्श विठोबाला मिळणं.” वारीचा गजर… आता तुमच्याच घरात.

री रिलीज होणार सुपरहिट ‘उमराव जान’; प्रीमियरमध्ये ‘हे’ स्टार्स लावणार हजेरी 

follow us