विठू माउली झाली तयार… वारीसाठी! आषाढीनिमित्त झी टॉकीज करणार घराघरात भक्तीचा गजर

विठू माउली  झाली  तयार… वारीसाठी! आषाढीनिमित्त झी टॉकीज करणार घराघरात भक्तीचा गजर

Zee Talkies Special Show for Aashadhi Wari 2025 : दरवर्षी लाखो वारकरी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जात असतात. विठ्ठल नामाचा जयघोष करत हे वारकरी दिंड्या घेऊन पंढरपूरला जातात. पंढरपूरला आषाढी एकादशीच्या दिवशी अभूतपूर्व असा सोहळा पाहायला मिळतो. वारकऱ्यांसाठी हा खास सोहळा असतो. वर्षभर वारकरी या क्षणाची वाट पाहात असतात. यानिमित्त झी टॉकीज एका खास शोच्या माध्यमातून घराघरात भक्तीचा गजर करणार आहे.

आमदार जगतापांना सल्ला द्यायची तुमची उंची नाही; तृप्ती देसाईंवर राष्ट्रवादी युवतींचा पलटवार

वारी म्हणजे चालणं नव्हे. ती म्हणजे भावना. पंढरपूरच्या रस्त्यांवर लाखोंच्या पावलांचा नाद, मातीचा गंध, आणि विठोबाच्या नावानं मन भरून येणारा प्रत्येक क्षण… पण सगळ्यांना ती चालता येतेच असं नाही. कधी तब्येत, कधी जबाबदाऱ्या, तर कधी वय — पंढरपूर दूर राहतं.म्हणूनच यंदा झी टॉकीजने घेतलेली ही सुंदर शपथ – “ज्यांना चालता येत नाही, त्यांच्यासाठी वारी घरी यावी!”
म्हणूनच विठ्ठल झाला तयार… वारीसाठी! १८ जूनपासून ते ६ जुलै एकादशीपर्यंत, ‘आषाढी वारी २०२५’ हा भक्तिपूर्ण सोहळा झी टॉकीजवर साजरा होणार आहे – आपल्या घरच्या टीव्हीवर!

फ्लॉप चित्रपटांना नुकसानीचे पैसे मिळतात का? जाणून घ्या, फिल्म इन्शुरन्सचा A टू Z हिशोब..

यंदाची वारी का खास आहे?

· संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५०व्या जयंतीवर्षात होणारी ही वारी
· पहिल्यांदाच थेट प्रक्षेपित होणारी ‘चंद्रभागेची आरती’
· १२ फूट उंच विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती – पंढरपूरची अनुभूती, घराघरात!
· हँडलूमवर पारंपरिक वस्त्र विणणारे भाविक आणि कीर्तनकारांची सजीव सादरीकरणं

हिंदी भाषा सक्तीची अनिवार्य असा शब्द कुठंय?, राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मंत्री भुसेंचा प्रतिसवाल

टीव्हीवर अनुभवता येणार भक्तीमय सोहळा: प्रत्येक पहाटे – थेट काकड आरती दिवसभर – गजर कीर्तनाचा, ‘मन मंदिरा’, ‘चाल गं सखे पंढरीला’सारखे भावस्पर्शी कार्यक्रम पंढरपूरच्या रस्त्यांवर उभं राहिलेलं झी टॉकीजचं भक्ती अनुभव केंद्र झी टॉकीजचे बवेश जानवलेकर म्हणतात: “वारी ही केवळ चालणं नाही, ती श्रद्धा आहे, संस्कृती आहे. आम्ही ती दाखवत नाही, आम्ही ती पोहोचवत आहोत – थेट तुमच्या मनात.”तयार व्हा – कारण यंदा वारी तुमच्याच दारी येतेय! १८ जून ते ६ जुलै – दररोज सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त झी टॉकीजवर. विठ्ठल झाला तयार… आणि वारीही!वारीचा गजर… आता तुमच्याच घरात!

follow us
  • fb
  • instagram
  • youtube