Download App

कला दिग्दर्शक नितीन देसाईंची आत्महत्या आर्थिक विवंचनेतून? पोलिसांनी दिली पहिली प्रतिक्रिया

मुंबई : सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Chandrakant Desai) यांच्या आत्महत्येने मोठी खळबळ उडाली आहे. कर्जत येथील एन.डी. स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी सिनेमासृष्टीवर शोककळा पसरली आहे. उरणचे अपक्ष आमदार महेश बालदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, देसाई मागील काही दिवसांपासून आर्थिक अडचणीत होते. यातूनच त्यांनी आत्महत्या केली. (Zone 2 Deputy Commissioner of Police Somnath Gharge gave the first official information about Nitin Desai’s suicide)

पोलीस काय म्हणाले?

झोन 2 चे पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी देसाई यांच्या आत्महत्येबद्दल पहिली अधिकृत माहिती दिली आहे. सकाळी नऊच्या दरम्यान दोरीच्या साह्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत खालापूर पोलीस स्थानकात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सध्या फॉरेन्सिक टीम, सायबर फॉरेन्सिक टीम, डॉग स्कॉड आणि फिंगरप्रिंट टीम पाचारण करण्यात आलेली आहे. अद्याप आत्महत्येचे कारण समजले नसून पोलिसांकडून सर्व पैलू तपासून घेतले जात आहेत, अशी माहितीही उपायुक्त घार्गे यांनी दिली.

मोठी बातमी! सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या! स्टुडिओमध्येच गळफास घेऊन संपवलं जीवन

आत्महत्येमागील नेमकं कारण काय?

उरणचे अपक्ष आमदार महेश बालदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी कला कलादिग्दर्शक यांनी आत्महत्या केली. ते आर्थिक अडचणीत होते अशी माहिती मिळत आहे. ‘स्टुडिओ फ्लिम वर चालतो. मात्र, स्टुडिओ चालत नसल्यामुळे ही घटना घडली आहे. गेल्या 2 महिन्यांपूर्वी त्यांच्याशी बातचीत झाली होती. तेव्हाही त्यांनी आर्थिक विवंचना सुरू आहे असल्याचे सांगितले होते, अशी माहिती दिली.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, नितीन देसाई यांच्यावर एकूण 249 कोटींचे कर्ज होते. त्यामुळे संबंधित वित्तीय संस्थेने वसुलीसाठी तगादा लावला होता. परंतु देसाई यांच्याकडून कर्जाची रक्कम भरली जात नव्हती. त्यामुळे कर्जाऊ दिलेली रक्कम वसूल करण्यासाठी तारण ठेवलेली मालमत्ता जप्त करण्यासाठी संबंधित वित्तीय संस्थेने रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली होती.  परंतु अद्याप हे प्रकरण जिल्हाधिकारी स्तरावर प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे.

Nitin Desai: अडीचशे कोटींच्या कर्जाचा डोंगर अन् स्टुडिओ जप्तीची भीती? नितीन देसाई होते आर्थिक विवंचनेत

नितीन देसाई यांची कारकीर्द :

सिनेमासृष्टीत प्रवेश करण्याअगोदर नितिन देसाई यांनी मुंबईतल्या सर जे.जे. कला महाविद्यालयातून प्रकाश चित्रणाचे प्रशिक्षण घेतले.  त्यानंतर 1984 पासून त्यांची सिनेमा कारकीर्द सुरू झाली. ‘1942 अ लव्ह स्टोरी’ या सिनेमामुळे ते खऱ्या अर्थाने चर्चेत आले होते. त्यानंतर ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘जोधा अकबर’, ‘प्रेम रतन धन पायो’ यासारख्या सिनेमांचं त्यांनी कला दिग्दर्शन केले होते.

20 वर्षांच्या कारकिर्दीत नितीन देसाई यांनी आशुतोष गोवारीकर, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी आणि संजय लीला भन्साळी यांसारख्या दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. नितीन देसाई यांनी ४ वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय सिनेमा पुरस्कार मिळवला आहे, तर ३ वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवला आहे.

Tags

follow us