तुम्हा आम्हाला ‘या अली रेहम अली’ म्हणायला लावणारा प्रसिद्ध गायक झुबीन गर्ग काळाच्या पडद्याआड

सिंगापूरमध्ये  स्कूबा डायव्हिंगचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या आसमच्या प्रसिद्द गायिका आणि सांस्कृतिक आयकॉन आयकॉन झुबीन गर्ग यांचे निधन झाले आहे

तुम्हा आम्हाला 'या अली रेहम अली' म्हणायला लावणारा प्रसिद्ध गायक झुबीन गर्ग काळाच्या पडद्याआड

तुम्हा आम्हाला 'या अली रेहम अली' म्हणायला लावणारा प्रसिद्ध गायक झुबीन गर्ग काळाच्या पडद्याआड

Renowned singer Zubeen Garg dies in Singapore : देशाच्या कला क्षेत्रातून एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे. सिंगापूरमध्ये  स्कूबा डायव्हिंगचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या आसमच्या प्रसिद्द गायक आणि सांस्कृतिक आयकॉन झुबीन गर्ग यांचे वयाच्या 52 वर्षी निधन झाले आहे. स्कूबा डायव्हिंग करताना घडलेल्या अपघातात त्यांचे निधन झाल्याचे सांगितले जात आहे. झुबीन यांच्या निधनाने केवळ संगीत उद्योगच नाही तर, संपूर्ण बॉलिवूड जगताला धक्का बसला आहे. गर्ग यांचे गँगस्टर चित्रपटातील ‘या अली रेहम अली’ हे गाणे सर्वांच्या पसंतीस उतरले होते. 

बॉलीवूडला दिली अनेक हिट गाणी

झुबीन गर्ग केवळ आसाममधील सर्वात प्रसिद्ध गायक नव्हते तर त्यांनी बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. ज्यात “गँगस्टर” चित्रपटातील “या अली” गाणी देखील समाविष्ट आहे. १९ते २१ सप्टेंबर रोजी होणाऱ्या नॉर्थईस्ट फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी ते सिंगापूरमध्ये गेले होते.

स्कूबा डायव्हिंग करताना अपघात

मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्कूबा डायव्हिंग करताना झुबीन यांचा अपघात झाला. त्यानंतर त्यांना तातडीने बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान गर्ग यांची प्राणज्योत मालवली. झुबीन केवळ एक उत्तम गायक नव्हे तर, अभिनेता, लेखकदेखील होते. झुबीन यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९७२ रोजी मेघालयात झाला. 

अनेक भाषांमध्ये गायली गाणी

आसामी व्यतिरिक्त झुबीन यांनी बंगाली, हिंदी, इंग्रजी, मल्याळम, मराठी, नेपाळी, ओडिया आणि संस्कृत यासह सुमारे ६० भाषांमध्ये गाणी म्हटली आहेत. एवढेच नव्हे तर, सुमारे 12 प्रकारची वाद्ये कशी वाजवायची हे झुबीन यांना माहीत होते. झुबीनचे पूर्ण नाव झुबीन बोरठाकूर गर्ग असे होते. 1995 मध्ये झुबीन मुंबईत आले आणि त्यांचा पहिला इंडीपॉप सोलो अल्बम चांदनी रात लाँच केला. गर्ज यांनी दिल से (1998), डोली सजाके रखना (1998), फिजा (2000), कांते (2002) यांसारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. 

Exit mobile version