सचिन तेंडूलकर - नाबाद 200
Sachin Tendulkar : सचिनचे 5 महारेकॉर्ड अजूनही अभेद्य; फक्त 'या' दोन खेळाडूंनी दिलीय टक्कर
2 / 8
वीरेंद्र सेहवाग - 219
भारतीय संघाची आक्रमक सुरुवात करणाऱ्या वीरेंद्र सेहवागने 8 डिसेंबर 2011 च्या दिवशी वेस्ट इंडिज विरुद्ध द्विशतकी खेळी केली होती. त्याने 149 चेंडूत 219 धावांची विक्रमी खेळी केली होती.
3 / 8
रोहित शर्मा - 209, 264, 208
वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकवणाऱ्या फलंदाजात रोहित शर्माचा बोलबाला आहे. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात तिसरे द्विशतक नोंदवणाऱ्या रोहितने तीन वेळा द्विशतक झळकावले आहे.
2 नोव्हेंबर 2013 ऑस्ट्रेलियाविरुद्ध 158 चेंडूत 209 धावा
13 नोव्हेंबर 2014 श्रीलंकेविरुद्ध 173 चेंडूत 264 धावा
13 डिसेंबर 2017 श्रीलंकेविरुद्ध 153 चेंडूत नाबाद 208 धावा
4 / 8
ख्रिस गेल - 215
जगातील सर्वाधिक आक्रमक फलंदाज म्हणून ख्रिस गेलची ओळख आहे. ख्रिस गेलने 24 फेब्रुवारी 2015 झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात 147 चेंडूत 215 धावांची खेळी केली होती.
5 / 8
मार्टिन गप्टिल - 237
न्यूझीलंडचा स्टार फलंदाज मार्टिन गप्टिल यानेही एक द्विशतक झळकावले आहे. 21 मार्च 2015 त्याने वेस्ट इंडिज विरुद्ध 163 चेंडूत नाबाद 237 धावांची खेळी केली होती.
6 / 8
फखऱ झमान - 210
या यादीत एका पाकिस्तानच्या खेळाडूचाही समावेश आहे. 20 जुलै 2018 झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात फखऱ झमान याने 156 चेंडूत नाबाद 210 धावांची खेळी केली होती.
7 / 8
ईशान किशन - 210
काही दिवसापूर्वी बांगलादेश विरुद्ध भारताचा युवा फलंदाज ईशान किशनने धमाकेदार खेळीसह द्विशतक झळकावले होते. 10 डिसेंबर 2022 बांगलादेश विरुद्ध त्याने 131 चेंडूत 210 धावांची खेळी केली होती.
8 / 8
शुबमन गिल - 208
18 जानेवारी 2023 च्या दिवशी न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात शुबमन गिलने धमाका केला. त्याने 149 चेंडूत 208 धावांची खेळी केली. त्याच्या भात्यातून निघालेले वनडेतील हे 10 द्विशतक ठरले असून अशी कामगिरी करणारा तो पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे.