Download App

3 ट्रेन धडकल्या! ओडिशामध्ये मृत्यूचं तांडव, पाहा फोटो

1 / 14

ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकावर शुक्रवारी संध्याकाळी दोन पॅसेंजर आणि एका मालगाडीचा भीषण अपघात.

2 / 14

3 ट्रेनच्या भीषण टक्करमध्ये 280 लोकांचा मृत्यू, 900 हून अधिक जखमी

3 / 14

रेल्वेच्या डब्यांत अजूनही अनेक मृतदेह अडकल्याचे भिती व्यक्त केली जातीय. लष्कराकडून बचावकार्य युद्ध पातळीवर सुरु आहे.

4 / 14

सर्वात आधी हावडा एक्सप्रेस मालगाडीला धडकली, त्यानंतर मालगाडी कोरोमंडल एक्सप्रेसला धडकली.

5 / 14

मदत यंत्रणांचे बचावकार्य सुरू असून, त्यामध्ये रेल्वेच्या बोगीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. अपघातानंतर रेल्वेने हेल्पलाईन नंबर जारी केला आहे.

6 / 14

(हावडा : 033 - 26382217) (खडगपूर : 8972073925, 9332392339) (बालासोर : 8249591559, 7978418322) (शालीमार (कोलकाता) : 9903370746) (रेलमदद : 044- 2535 4771)

7 / 14

पंतप्रधानांनी राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये मदत जाहीर केली.

8 / 14

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपये देण्याची घोषणा केली. तसेच गंभीर जखमींना 2 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली.

9 / 14

विविध रुग्णालयात दाखल जखमी प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी लोक मोठ्या संख्येने रक्तदान करत आहेत. रुग्णालयाबाहेर रक्तदात्यांच्या रांगा लागल्या आहेत.

10 / 14

कोरोमंडल एक्स्प्रेस कोलकाताजवळील शालीमार स्थानकावरून चेन्नई सेंट्रलला जात असताना बहंगा बाजार स्थानकावर सायंकाळी 7.20 वाजता ही घटना घडली.

11 / 14

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलवली तातडीने बैठक अन् घेतला रेल्वे दुर्घटनेचा आढावा घेतला.

12 / 14

देशातील हा आजवरचा सर्वात भीषण अपघात असल्याचे सांगितले जात असून या घटनेत मृतांची संख्या वाढत चालल्याचं दिसतंय.

13 / 14

यापूर्वी ‘6 जून 1981’ रेल्वेच्या इतिहासात भारतातील सर्वात मोठा आणि जगातील दुसरा मोठा रेल्वे अपघात झाला होता.

14 / 14

9 डब्यांची पॅसेंजर ट्रेन 416DN मानसीहून सहरसाला जात होती. या दुर्घटनेत सुमारे 300 जणांना जीव गमवावा लागला आहे, परंतु स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की मृतांची संख्या किमान 800 ते 1000 होती.

Tags

follow us