अभिनेत्री करिश्मा तन्नाचा साडी स्वॅग, दक्षिण कोरियात टिपले सुंदर फोटो
letsupteam
Karishma Tanna
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री करिश्मा तन्ना तिच्या प्रत्येक लूकने चाहत्यांना आकर्षित करते. नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती साडी नेसलेली दिसत आहे.
ब्लॅक आणि व्हाईट कलरच्या शेवरॉन प्रिंटेड क्रेप सिल्क साडीमध्ये करिश्मा खूपच सुंदर दिसत आहे.
स्टायलिश दिसण्यासाठी करिश्माने साडीसोबत बेल्ट घातला आहे, यासोबतच तिने मेकअप नॅचरल आणि हेअरस्टाईल ओपन आहे.
दक्षिण कोरियातील बुसानमध्ये करिश्माने हे फोटो काढले आहेत. करिश्माने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘बुसानच्या रस्त्यावर, ओनली लव्ह’
करिश्मा अलीकडेच ओटीटीवर रिलीज झालेल्या ‘स्कूप’ या वेब सीरिजमध्ये दिसली होती. या मालिकेतील तिचा अभिनय लोकांना आवडला आहे.
‘स्कूप’ सीरीजसाठी अभिनेत्री करिश्मा तन्ना हिला ‘एशिया कंटेंट अवॉर्ड्स अँड ग्लोबल ओटीटी अवॉर्ड्स 2023’ मध्ये ‘सर्वोत्कृष्ट लीड अभिनेत्री’साठी नामांकन मिळाले आहे.
आता करिश्मा ‘Asia Content Awards आणि Global OTT Awards’ साठी बुसान, दक्षिण कोरियाला पोहोचली आहे.