Axar Patel Wedding : केएल राहुलनंतर अक्षर पटेलही लग्नाच्या बेडीत, पत्नी आहे रील्सस्टार
letsupteam
_LetsUpp (2)
भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल आज विवाहबंधनात अडकणार आहे.
केएल राहुलनंतर आज आणखी एका भारतीय क्रिकेटपटूचे लग्न झाले आहे. अक्षर पटेल त्याची गर्लफ्रेंड मेहा पटेल हिच्याशी लग्न करतोय.
दोघेही गेल्या 10 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर आता अक्षर आणि मेहा एकत्र येणार आहेत.
त्यांच्या लग्नाचा व्हिडिओही आता समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अक्षर घोड्यावर स्वार होऊन नववधूच्या घरी जाताना दिसत आहे.
अक्षरची पत्नी मेहा डाइटीशियन आहे.
मेहा सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. तिला इन्स्टाग्राम रील्स बनवण्याची आवड आहे. त्याच्या रील चाहत्यांनाही खूप आवडतात.