कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी दिल्लीतील कोरलबाग येथील एका गॅरेजमध्ये मेकॅनिक्ससोबत काम केले. त्यांनी मंगळवारी रात्री याबद्दल आपल्या फेसबुक अकाऊंटवर फोटो शेअर करत माहिती दिली.
2 / 5
यामध्ये राहुल यांच्या हातामध्ये दुचाकीचा भाग दिसत आहे. त्यांच्या समोर एक दुचाकी ओपन करून ठेवलेली आहे.
3 / 5
गॅरेजमध्ये मेकॅनिक्स आणि काही लोक राहुल यांच्यासोबत दिसत आहेत. ते त्या कामगाराकडून मशीनची माहिती घेत आहेत.
4 / 5
तर एका फोटोमध्ये राहुल स्क्रू ड्रायव्हरने दुचाकीचे स्क्रू फिट करताना दिसत आहेत.
5 / 5
या फोटोंना कॅप्शन देताना राहुल गांधी यांनी लिहिले की, त्या हातांनी शिकलो जे पाना फिरवतात आणि भारताच्या चाकांना गतिमान करतात.