Ajit Pawar : राज्याच्या राजकारणात आजचा दिवस मोठ्या घडामोडींनी गाजणार आहे. कारण सातारा, सांगली, बारामती या प्रतिष्ठेच्या मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीचं जोरदार शक्तीप्रदर्शन पहायला मिळणार आहे.
2 / 5
या दरम्यान अजित पवार हे बारामती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले.
3 / 5
सध्या पत्नीच्या प्रचारात व्यस्त असलेले अजित पवार प्रत्येक ठिकाणी सभा घेताना दिसत आहेत. त्याच वेळी ते अर्धांगिनीसाठी दगडूशेठ चरणी लीन झाल्याचंही पाहायला मिळालं.
4 / 5
यावेळी अजित पवार आणि सुनेत्रा पवार या दाम्पत्यासोबत दिपक मानकर, प्रदीप देशमुख हे मान्यवर देखईल उपस्थित होते.
5 / 5
तर आज बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते उपस्थित राहणार आहेत.