मराठी सिनेविश्वातील दोन ताकदवान अभिनेत्री अमृता सुभाष आणि सोनाली कुलकर्णी यांना एकत्र पाहाण्याची उत्सुकता वाढली
काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘परिणती’ – बदल स्वतःसाठी’ (Parinati Movie) या मराठी चित्रपटाच्या पोस्टरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.
ट्रेलरमध्ये अमृता सुभाष (Amruta Subhash) एका डॉक्टरच्या भूमिकेत दिसत असून, ती आपल्या नवऱ्यासोबत आणि मुलासोबत एक सुखी कुटुंब जगत आहे.
ही कथा आहे दोन विभिन्न पार्श्वभूमी असलेल्या (Entertainment News) स्त्रियांची. त्यांच्या अनपेक्षित भेटीची, वाढत चाललेल्या मैत्रीची आणि संघर्षातून सशक्तपणे उभ्या राहिलेल्या आयुष्याची.
सोनाली कुलकर्णी, जी एका बार डान्सरची भूमिका साकारत आहे, ती अमृताला आधार देण्यासाठी पुढे येते.
सोनालीचा सकारात्मक दृष्टिकोन आणि तिच्या स्वाभाविक सहानुभूतीमुळे, दोघींमध्ये एक हळुवार आणि घनिष्ट मैत्री निर्माण होत असल्याचे दिसतेय.