अहिल्यानगरचे माजी नगराध्यक्ष व विधानपरिषदेचे दोन टर्म सदस्य राहिलेले अरुणकाका बलभीम जगताप यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांचं पार्थिव राहत्या घरी सारसनगर येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर नगर शहरातून अंत्ययात्रा काढण्यात आली होती.
त्यांच्यावर अमरधाम या स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी शहरासह जिल्ह्यातीन जनसागर उळसल्याचं पाहायला मिळालं.
यामध्ये मंत्री दत्ता मामा भरणे, अंकुश काकडे, आमदार अमोल खताळ, आमदार सुरेश धस, खासदार निलेश लंके, माजी खासदार सुजय विखे, भानुदास कोतकर, माजी आमदार दादा कळमकर, माजी आमदार भीमराव धोंडे, बबनराव पाचपुते,राहुल जगताप, भानुदास मुरकुटे, अशोक सोनवणे, अभय आगरकर, शशिकांत गाडे, हभप तनपुरे महाराज, सुनील अण्णा टिंगरे यांचा समावेश होता.
यावेळी मंत्री विखे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, लोकांसाठी अहोरात्र काम करणारा नेता गमावला.