Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रा काश्मीरमध्ये पोहचताच राहुल गांधीच्या टीशर्टची पुन्हा चर्चा
letsupteam
_LetsUpp (1)
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचली आहे. कन्याकुमारी येथून सुरू झालेली यात्रा आता शेवटच्या टप्प्यात आहे.
यात्रा आज काश्मीर,मध्ये पोहचली तेव्हा पाऊस पडत होता, सोबत काश्मीरमधली कडाक्याची थंडी जाणवत आहे.
थंडी आणि पाऊस टाळण्यासाठी राहुल गांधी यांनी काळ्या रंगाचे जॅकेट घातलेले दिसले, त्यामुळे त्यांच्या सफेद टी शर्टची पुन्हा सोशल मीडियावर चर्चा रंगली.
राहुल गांधी यांनी जॅकेट घातले असले तरी पाऊस थांबल्यानंतर त्यांनी पुन्हा जॅकेट काढून चालण्याला सुरुवात केली. त्यांच्या या कृतीचेदेखील सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत.
दरम्यान आज शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) खासदार संजय राऊत राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाले. गेल्या काही दिवसापासून संजय राऊत भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा होत्या. आज ते यात्रेत सहभागी झाले.