परदेशात चित्रीकरण करणं हे मराठी सिनेसृष्टीसाठी आता काही नवीन राहिलेले नाही. परंतु, भारतातीलच एक असं ठिकाण जे समुद्र सपाटीपासून हजारो फूट उंच, ऑक्सिजन पातळी (Movie) अगदी कमी, जिथे हवामान कधी बदलेल याचा नेम नाही, अशा ठिकाणी चित्रीकरण करणे हे निश्चितच आव्हानात्मक आहे आणि हे ठिकाण आहे भारताच्या ईशान्य भागातील सिक्कीम.
स्नेह पोंक्षे दिग्दर्शित ‘बंजारा’ या चित्रपटाचे चित्रीकरण हे निसर्गरम्य सिक्कीममध्ये झाले आहे. त्यामुळे ‘बंजारा’ हा केवळ मराठीच नाही तर भारतीय सिनेसृष्टीतील पहिला चित्रपट आहे, ज्याचे चित्रीकरण सिक्कीममध्ये झाले आहे.
यात सिक्कीमचे मनमोहक सौंदर्य आणि मित्रांची बाईक राईड बघून अनेकांना खूप छान वाटलं असेल. हे पडद्यावर जितके सहज, सुंदर दिसत असले तरी या ठिकाणी चित्रीकरण करणं, हे प्रचंड आव्हानात्मक होतं. याबाबतचा अनुभव चित्रपटाचे दिग्दर्शक स्नेह पोंक्षे यांनी शेअर केला आहे.
दिग्दर्शक स्नेह पोंक्षे म्हणतो, ‘हे एक असं चित्रीकरण स्थळ आहे, जिथे आजवर कोणत्याच चित्रपटाचे चित्रीकरण झालेले नाही. ही जागाच अशी आहे, की कोणालाही प्रेमात पाडेल.
या सगळ्यासाठी आम्हाला इंडियन आर्मीचे खूप सहकार्य लाभले. मैत्री आणि आत्मशोधाचा सुंदर संदेश देणारा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.