'बिग बॉस हिंदी'चं नवं पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या पर्वात मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडे पती विकी जैनसह सहभागी झाली आहे. पहिल्या दिवसापासूनच अंकिता आणि विकी घरातील चर्चेतील सदस्यांपैकी एक आहेत.
2 / 4
अंकिता आणि विकी 'बिग बॉस'च्या घरात एकमेकांना सपोर्ट करत उत्तम खेळत इतर सदस्यांची कोंडी करताना दिसत आहेत.' बिग बॉस'च्या घरात येण्याआधी अंकिताच्या कपड्यांविषयी जोरदार चर्चा रंगली होती. अंकिता-विकीने 'बिग बॉस'साठी तब्बल 200-250 आउटफिट खरेदी केल्याची चर्चा होती.