Download App

जय श्री राम..! मुकेश अंबानींचे ‘अँटिलिया’ प्राणप्रतिष्ठा साेहळ्यासाठी सजले, पाहा फोटो

  • Written By: Last Updated:
1 / 6

अयोध्‍येत रामलल्‍ला प्राणप्रतिष्‍ठा सोहळ्यास अवघ्‍या काही तासांचा अवधी राहिला आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी संपूर्ण देशभरात सर्वच स्‍तरांंमध्‍ये अभूतपूर्व असा उत्‍साह आहे. हा ऐतिहासिक क्षण दिवाळी सणासारखाच आनंदाने साजरा केला जाणार आहे. यामध्‍ये उद्योगजगतही आघाडीवर आहे.

2 / 6

रामलल्‍ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी देशातील प्रख्‍यात उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्‍थान ‘अँटिलिया’ विशेष पद्धतीने सजवण्यात आले आहे. यावेळी मुकेश अंबानी यांच्या घर अँटिलिया येथे राम भक्तीची झलक पहायला मिळाली, संपूर्ण इमारतीत दिवे आणि जय श्री राम कलाकृती दिसत होत्या.

3 / 6

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित राहणार आहेत.

4 / 6

अँटिलियाच्या सभोवतालच्या दिव्यांच्या माध्यमातून प्रभू रामाचे नाव दाखवण्यात आले आहे.

5 / 6

रामभक्तीत तल्लीन झालेल्या अँटिलियाची ही चित्रे खरोखरच अप्रतिम आहेत.

6 / 6

राम भक्तीत तल्लीन झालेल्या मुकेश अंबानी कुटुंबाच्या घराचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

follow us