संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder Case) प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात सीआयडीने आरोपपत्र दाखल केले आहे.
या दरम्यान आता सीआयडीच्या हाती देशमुख यांच्या हत्येचे काही फोटो लागले आहेत जे व्हिडिओतून काढण्यात आलेल्या स्क्रीन शॉट जोडण्यात आले आहेत.
हे फोटो अत्यंत क्रूर दिसत आहेत. जे पाहिल्यावर काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहत नाही. देशमुख यांची हत्या झाली त्यावेळी हा व्हिडिओ लाईव्ह शेअर करण्यात आला होता.
आरोपींच्या एका मोकारपंथी नावाच्या ग्रुपमध्ये हे व्हिडिओ शेअर करण्यात आले होते. सीआयडीच्या हाती आता हेच व्हिडिओ लागले आहेत. जे पुरावे म्हणून समाविष्ट करण्यात आले आहेत.