दावोसमध्ये घुमला ‘जय जय महाराष्ट्र माझा’चा सूर… पाहा फोटो
letsupteam
Eknath Shinde
स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वित्झर्लंड येथे पोहोचले आहेत.
स्वित्झर्लंडमधील बृहन महाराष्ट्र मंडळाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
परदेशातही आपल्या संस्कृतीशी असलेले घट्ट नाते जपून ठेवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले.
यावेळी उपस्थित सर्वांनी महाराष्ट्र गीत गायले. यानिमित्ताने स्वित्झर्लंडच्या भूमीतही मराठी मातीचा सुगंध दरवळल्याची भावना होती.
दावोस येथे 15 ते 19 जानेवारी या कालावधीत ही जागतिक आर्थिक परिषद होणार आहे.
या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांसह, उद्योग मंत्री उदय सामंत तसेच उद्योग विभाग, एमआयडीसी, मुख्यमंत्री सचिवालयातील वरिष्ठ अधिकारी असे शिष्टमंडळ सहभागी आहे.