मुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्री भीमाशंकराच्या चरणी नतमस्तक, विधिवत पूजा
sagargorkhe letsup
Cm Eknath Shinde Bheemashankar
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली.
राज्यावरचे संकट दूर होऊन राज्य सुजलाम सुफलाम होऊदे
राज्यातील सर्व घटकांना सुख, समाधान आणि आनंद मिळू दे अशी प्रार्थना भगवान भीमाशंकराकडे केल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले
यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे आदी उपस्थित होते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रावणी सोमवारी दर्शनासाठी आलो असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
येथे लाखो भक्त येत असल्याने शासनाने १४८ कोटींचा विकास आराखडा तयार केला आहे
बळीराजावरचे संकट दूर कर, राज्यभर समाधानकारक पाऊस पडू दे