मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वर्षा निवासस्थानी श्री गणरायाची सहकुटुंब आरती केली.
वर्षा निवासस्थानी यावेळी त्यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
फडणवीस : “गेले दहा दिवस गणरायाच्या सानिध्यात कसे गेले ते कळलेच नाही”.
बाप्पाला निरोप देताना फडणवीसांकडून मनोभावे प्रार्थना करण्यात आली.
फडणवीस : यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय मामकीम्। इष्टकामसमृद्धयर्थं पुनर्अपि पुनरागमनाय च॥
यावेळी गणरायाकडे जनतेची सर्व चिंता-विघ्ने दूर करण्याची त्यांनी प्रार्थना केली.
फडणवीसांनी बाप्पाने पुढच्या वर्षी अशाच प्रकारे आनंद घेऊन लवकर येण्याची प्रार्थनाही केली.
मुख्यमंत्री यावेळी गणरायाच्या आरतीत तल्लीन होताना दिसुन आले.