CM Shinde : दावोस दौऱ्याहून आलेल्या मुख्यमंत्र्यांचं उत्साहात स्वागत, पाहा फोटो
shruti letsupp
CM Shinde
CM Shinde : तीन दिवसांचा दावोस दौरा आटोपून आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Shinde) यांचे आज छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ढोल ताशांच्या गजरात मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.
या दौऱ्यात 3 लाख 53 हजार कोटींचे विक्रमी सामंजस्य करार झाले असून 1 लाख कोटींच्या गुंतवणुकीबाबत स्वारस्य दाखवण्यात आले आहे. तसेच या गुंतवणुकीच्या माध्यमातून 2 लाख रोजगार निर्मिती होणार आहे.
विशेष म्हणजे राज्यात गुंतवणूक करण्यासाठी आर्सेनिल मित्तल, निप्पोन, जिंदाल, अदानी यासारख्या नामांकित कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे.
तसेच काही देशांतील मंत्र्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केल्याचे यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.
तसेच गतवर्षी झालेल्या 1 लाख 37 हजार कोटीच्या सामंजस्य करारांपैकी 80 टक्के करार पूर्ण करण्यात आले होते.
यावेळीही केलेले करार पूर्णत्वास नेण्याकडे सरकारचा कटाक्ष राहील असे यावेळी बोलताना स्पष्ट केले.
यावेळी दीपक केसरकर, मंगलप्रभात लोढा, अमित साटम, आमदार बालाजी कल्याणकर, रवींद्र फाटक आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.