कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या की, भारतीय सैन्याने पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील पाच ठिकाणांवर हल्ला केला.
भारतीय लष्कराने क्षेपणास्त्र हल्ल्याचे फोटो प्रसिद्ध केले आहेत.
पाकिस्तानी सीमेवर दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारे चार अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.
आंतरराष्ट्रीय सीमेच्या आत 100 किलोमीटर अंतरापर्यंत असलेले दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे मुरीदके येथील लष्करच्या मुख्यालयावर मरकज तैयबावर एकामागून एक चार क्षेपणास्त्रे डागण्यात आली.
पीओजेकेमधील पाच दहशतवादी अड्ड्यांवर क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले, चार दहशतवादी अड्डे पाकिस्तानी हद्दीत आहेत.
भारतीय लष्कराच्या महिला अधिकारी – विंग कमांडर व्योमिका आणि कर्नल सोफिया यांनी ऑपरेशन सिंदूरची सविस्तर माहिती दिली.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने हल्ला केलेल्या नऊ ठिकाणांचे फोटो समोर आलेत.
पहलगाम इथे निष्पाप भारतीयांवर भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आला होता.