ब्रिटनच्या किंग चार्ल्स III चा राज्याभिषेक: हजारो कोटींचा खर्च, पाहा फोटो
letsupteam
Untitled Design
इंग्लडच्या राजाचा राज्याभिषेक सोहळा आज संपन्न झाला. राजा चार्ल्स तिसरा नवीन ‘राजा’ बनला आहे.
ब्रिटनमधील वेस्टमिन्स्टर अॅबे चर्चमध्ये राजा चार्ल्स तिसरा आणि राणी कॅमिला यांचा राज्याभिषेक करण्यात आला.
ब्रिटनच्या राजघराण्यात 70 वर्षांनंतर ही घटना घडली आहे. यापूर्वी 1953 मध्ये राणी एलिझाबेथ यांचा राज्याभिषेक झाला होता.
किंग चार्ल्स यांचा वयाच्या 74 व्या वर्षी राज्याभिषेक झाला.
या सोहळ्याची तयारी अनेक महिन्यांपासून सुरू होती. राजा चार्ल्स पांढरे घोडे असलेल्या सोन्याच्या रथावर बसले होते.
प्रिन्स चार्ल्स आणि क्वीन कॅमिला बकिंगहॅम पॅलेसहून वेस्टमिन्स्टर चर्चकडे निघाले. त्यांचे अंगरक्षकही सोबत चालत होते.
वेस्टमिन्स्टर अॅबे चर्चमध्ये बिशपने राजा चार्ल्स यांना शपथ दिली.
प्रिन्स चार्ल्स आणि क्वीन कॅमिला बकिंगहॅम पॅलेसहून वेस्टमिन्स्टर चर्चकडे निघाले असनाचे दृश्य..
राज्याभिषेकाला उपस्थित असलेले पाहुणे वेस्टमिन्स्टर अॅबे चर्चमध्ये उपस्थित होते.
हे चित्र राज्याभिषेकाच्या काही दिवस आधीचे आहे.
ब्रिटनमधील चार्ल्स-कॅमिला यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी रस्त्यावर असे दृश्य होते. सर्वत्र ब्रिटीशांचा झेंडा दिसत होता.