Download App

बंड ते मुख्यमंत्री, कसा होता एकनाथ शिंदेंचा प्रवास? पाहा फोटो…

1 / 18

गेल्या वर्षी 20 जूनला एकनाथ शिंदे नॉटरिचेबल झाले आणि त्यानंतर शिवसेनेतील बंडाचं नाट्य आणि राज्यातील राजकारणात थरारक घटनाक्रम सुरू झाला. त्या गोष्टीला आज एक वर्ष पूर्ण झालं. विधानपरिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर विधानसभेतून ठाणे, सुरत, गुवाहाटी आणि गोवा असा रंजक प्रवास केला. 30 जूनला शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि या त्यांच्या सत्ता नाट्यावर पडदा पडला. पण त्यांचा बंड ते मुख्यमंत्री हा प्रवास कसा होता जाणून घेऊ...

2 / 18

21 जूनला शिंदे समर्थक आमदारांसह गुजरातच्या सुरतमध्ये गेले. तेथे ली मेरिडियन हॉटेलमध्ये राहिले. शक्तिप्रदर्शन केलं

3 / 18

त्यानंतर ते भाजप शासित राज्य असलेल्या आसामच्या राजधानीत गुवाहाटीत दाखल झाले.

4 / 18

शिंदेंविरोधात कारवाईचा इशारा देत शिवसेनेने अजय चौधरी यांची गटनेतेपदी तर सुनील प्रभु यांची प्रतोदपदी निवड केली. तर शिंदेंनी भरत गोगावलेंची प्रतोदपदी निवड केली.

5 / 18

यावेळी शिंदे आपल्या आमदारांना वेळोवेळी संबोधित करून आपल्या भूमिकेवर ठाम राहण्यास मार्ग दर्शन करायचे. बघता बघता शिंदेंच्या बाजूने 40 आमदार आले.

6 / 18

याच वेळी सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटलांचं 'काय झाडी, काय डोंगर, काय हाटील' हा फोनवरील संवाद व्हायरल झाला. सर्वांनी त्याचा आनंद घेतला.

7 / 18

दोन दिवसांनंतर मंत्री गुलाबराव पाटीलही शिंदे गटाला जाऊन मिळाले.

8 / 18

एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं म्हणत आमदारांनी शिंदेंना सर्वाधिकार दिले

9 / 18

अगोदर उद्धव ठाकरेंच्या बाजूने असलेले मंत्री उदय सामंत देखील शिंदे गटाला जाऊन मिळाले.

10 / 18

गुवाहाटीवरून निघण्याच्या आदल्या दिवशी त्यांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं.

11 / 18

29 जूनला त्यांनी गुवाहाटीवरून गोव्याला प्रस्थान केलं.

12 / 18

त्यानंतर ते मुंबईला रवाना झाले. ते जिथे जिथे होते तिथे तिथे भाजपने त्यांची विशेष व्यवस्था केली.

13 / 18

30 जूनला राज्यात विधानसभेत बहुमत चाचणी होणार होती पण उद्धव ठाकरेंच्या गैर हजेरीमुळे थेट शिंदे-फडणवीसांचा शपथविधी जाहिर झाला.

14 / 18

राजभवनावर ट्विस्ट पाहायला मिळाला. देवेंद्र फडणवीसांनी अचानक अनपेक्षितपणे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर आपण सत्तेबाहेर राहणार असल्याचे सांगितले.

15 / 18

त्यानंतर पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने 2 तासांतच देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तो या घटनाक्रमातील मोठा ट्विस्ट ठरला.

16 / 18

त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी रात्री पुन्हा गोवा गाठलं आणि तेथील मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली.

17 / 18

काही वेळातच शिंदेंनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. तेव्हा उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्याबरोबर देवेंद्र फडणवीस देखील होते.

18 / 18

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिंदेंनी आपल्या आमदारांशी व्हिडीओ कॉल करून संवाद साधला.

Tags

follow us