‘जी-२०’ च्या पाहुण्यांनी दिली पुण्यातील वारसास्थळांना भेट; पाहा फोटो
letsupteam
_LetsUpp
जी-२० बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींनी पुण्यातील वारसास्थळांना भेट दिली.
सकाळी शनिवार वाड्यापासून या भेटीला सुरूवात झाली. या वास्तूची भव्यता पाहून पाहुणे स्तिमित झाले.
नोंदवहीमध्ये शनिवार वाडा अत्यंत सुंदर, भव्य आणि आकर्षक असल्याची प्रतिक्रीया त्यांनी नोंदविली.
यानंतर त्यांनी लाल महालालाही भेट दिली.
राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि बाल शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिल्यानंतर त्यामागचा इतिहासही त्यांनी जाणून घेतला.
काही प्रतिनिधी महालातील राजमाता जिजाऊंच्या पुतळ्यालाही अभिवादन केले.
जी-२० प्रतिनिधींनी आगाखान पॅलेसला ही भेट देऊन महात्मा गांधीजी यांच्या जीवनाविषयी माहिती घेतली.
त्यांनी गांधीजींचे बालपण, कस्तुरबा गांधींचे जीवन, आगाखान पॅलेस येथील गांधीजींचे वास्तव्य याबाबत माहिती विचारली.
आपल्या मोबाईलमध्ये त्यांनी खास फोटो टिपले
सर्व फोटो – जिल्हा माहिती अधिकारी