गडाख-घुले झाले व्याही, उदयन गडाख आणि निवेदिता घुले यांचा विवाह संपन्न
letsupteam
आमदार शंकरराव गडाख यांचे सुपुत्र आणि चंद्रशेखर घुले यांची कन्या डॉ. निवेदिता घुले यांचा विवाह संपन्न झाला.
या विवाह सोहळ्याला राज्यभरातील सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावलीय. यावेळी खासदार. शरद पवार, आदित्य ठाकरे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन जाधव, आदी उपस्थित होते.
विवाह सोहळ्याला येणाऱ्या पाहुण्यांचं आमदार शंकरराव गडाख यांनी मोठ्या अदबीने हात जोडून स्वागत केलं.
यावेळी आ. बबनराव पाचपुते, आ. मोनिका राजळे, आ. संग्राम जगताप, यांच्यासह जिल्ह्यातील आमदारांनी हजेरी लावली होती.